
साई भक्तांना नववर्षाची अनोखी भेट! ३१ डिसेंबरला शिर्डीत मंदिर दर्शनासाठी रात्रभर राहणार खुले (Photo Credit - X)
Shirdi Sai Baba Temple | नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीचं साईमंदिर रात्रभर खुलं असणार | NDTV मराठी#shirdisaibaba #shirdisaibabatemple #devotional #ndtvmarathi pic.twitter.com/rqDE55xwvP — NDTV Marathi (@NDTVMarathi) December 29, 2025
जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा आनंद
साई भक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने, शिर्डीमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यासाठी साई बाबा संस्थानने विशेष तयारी केली आहे. जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा आनंद घेता यावा यासाठी, साई बाबा मंदिर ३१ डिसेंबर रोजी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, ३१ डिसेंबर रोजी होणारी शेजारती आणि १ जानेवारी रोजी सकाळी काकड आरती होणार नाही. ही माहिती साई बाबा संस्थानने दिली आहे.
शिर्डीत अतिरिक्त महाराष्ट्र पोलिस दल तैनात
नाताळच्या सुट्ट्यांसाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो साई भक्त शिर्डीत येण्याची अपेक्षा आहे. भाविकांच्या सोयीसाठी, साई संस्थानने दर्शन व्यवस्था, निवास व्यवस्था, प्रसाद आणि जेवणाबाबत विशेष उपाययोजना केल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शिर्डीत अतिरिक्त महाराष्ट्र पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.