
भररस्त्यात पेटवून घेतल्याने महिलेचा होरपळून मृत्यू; कराडच्या ओगलेवाडी-टेंभू रस्त्यावरील घटना
कराड : गोवारे फाट्यानजीक ओगलेवाडी-टेंभू रोडवर भररस्त्यात महिलेने ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये संबंधित महिला गंभीररित्या भाजल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही धक्कादायक घटना घडली. गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत संबंधित महिलेची ओळख पटली नव्हती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ओगलेवाडी-टेंभू रोडवरील गोवारे फाट्यावर गोवारे गावच्या बाजूकडून एक महिला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आली. बराचवेळ संबंधित महिला त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला एकटीच उभी राहिली होती. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांनी तिला पाहिले होते. मात्र, ती कोणाचीतरी वाट पाहत असावी, असा समज झाल्याने तिच्याकडे कोणी विचारपूस केली नाही.
हेदेखील वाचा : बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…
दरम्यान, काही वेळातच ग्रामस्थांना समजण्यापूर्वीच महिलेने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत पेटवून घेतले. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत संबंधित महिला गंभीररित्या भाजली होती, यात तिचा जागीच मृत्यू झाला.
कराड पोलिस घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत महिलेची ओळख पटली नव्हती.
यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, यमुना एक्स्प्रेस वेवर एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. पहाटेच्या वेळी दाट धुक्यामुळे यमुना एक्स्प्रेस वेवर अनेक वाहन एकमेकांवर धडकल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात आग पसरून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात ४३ जण जखमी झाले आहेत. या अपघातात आठ बस आणि तीन वाहने एकमेकांना धडकली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा अपघात पहाटेच्या वेळी दाट धुक्यांमुळे झाला.
हेदेखील वाचा : Accident: यमुना एक्स्प्रेस वेवर धुक्यामुळे भीषण साखळी अपघात; वाहनांना आग लागून 13 जणांचा होरपळून मृत्यू, 43 जखमी