कोथरूड पोलिसांकडून तरुणीविरुद्ध गुन्हा (फोटो- istockphoto)
कोथरूड पोलिसांकडून तरुणीविरुद्ध गुन्हा
पतीच्या चेहऱ्यावर उकळता चहा टाकला
आरोपी तरुणाचा तरुणीशी दोन वर्षांपूर्वी झाला होता विवाह
पुणे: कौटुंबिक वादातून तरुणीने पतीच्या चेहऱ्यावर उकळता चहा टाकल्याची घटना कोथरूडमध्ये (Pune)घडली. याप्रकरणी महिलेवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २७ वर्षीय तरुणाने कोथरूड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपी २३ वर्षीय पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचा तरुणीशी दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पती खासगी ठिकाणी सुरक्षारक म्हणून नोकरी करत आहे. तो आणि त्याची पत्नी पौड रोडला राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद सुरू होते. बुधवारी (३१ डिसेंबर) सकाळी तक्रारदार तरुण झोपला होता.
सकाळी साडेदहाच्या सुमारास तिने पतीला झोपेतून उठवले. पतीने झोपेचे सोंग केल्याचा आरोप तिने केला .सकाळी साडेदहाच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. वादातून तिने त्याच्या अंगावर गॅसवर ठेवलेला उकळता चहा फेकला. तो चेहऱ्यावर पडला. या घटनेत तरुणाच्या चेहऱ्याला दुखापत झाली. पोलीस हवालदार एम. जी. दळवी तपास करत आहेत.






