गोसेच्या कालव्यात तरुणाचा मृत्यू
कर्जत : नेरळ परिसरात असणाऱ्या पाषाणे या धरणावर दिघी, नवी मुंबई येथील चार तरुण मित्र शनिवारी सायंकाळी पर्यटनास आले होते. ते आंघोळीसाठी धरणात उतरले असता अजय विष्णू रावत (वय 28) हा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध न लागल्याने खोलीच्या हेल्प फाउंडेशनच्या टीमला पोलिसांनी बोलावले व रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अजयचा मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले.
दिघा गावातील अजय रावत हे वाहतूक व्यवसाय करत होते. कार घेऊन ते आपल्या चार मित्रांसह कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे नातेवाईक यांच्याकडे आले होते. शनिवारी दुपारी भोजन उरकून अंघोळी करण्यासाठी जाण्यास निघाले. दुपारची वेळ असल्याने आजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती. तेव्हा ते पाण्यात उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला.
दिवसभर घेतला शोध
नेरळ पोलिस ठाण्याकडून कळंब पोलीस चौकीचे उपनिरीक्षक आर. एल. वसावे तसेच पोलिस नाईक निलेश कोंडार हे पाषाणे येथील धरणावर पोहचले. तेथे पोलिसांनी स्थानिक आदिवासी लोकांच्या मदतीने अजय रावत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील शोध लागला नसल्याने शेवटी पोलिसांनी शोधकार्य थांबवले. नंतर दुसऱ्या दिवशी शोध घेतला असता मृतदेह सापडला.
पाण्याचा अंदाज न आल्यामुळे झाला मृत्यू
पाषाणे धरणातील पाण्यात उतरलेला अजय विष्ण्या रावत हा पाण्याच्या बाहेर आला नाही. त्यामुळे त्याचे चारही मित्र घाबरले आणि तब्बल तासाभराने अजयसोबत असलेल्या तरुणांनी नातेवाईकांना अजय बुडला असल्याची माहिती दिली. त्यानंतर साडेचार वाजता सर्व नातेवाईक हे धरणावर पोहचले आणि पुन्हा अजय रावत यांचा शोध सुरु झाला. मात्र, त्याचा शोध लागत नसल्याने साडेपाच वाजता नेरळ पोलीस यांना कळविण्यात आले.