Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : शासनाचा महसूल बुडवून कारशेडसाठी मातीचा भराव; खोदकामामुळे पाली भूतीवली धरणाला धोका

पाली भूतीवली धरणाचे पाणी अडवलेल्या डोंगराची दुसरी बाजू कारशेडच्या कामासाठी माती भरावसाठी खोदकाम सुरु आहे. या खोदकामांमुळे गावातील शेतकरी हतबल झाले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 08, 2026 | 02:44 PM
Karjat News : शासनाचा महसूल बुडवून कारशेडसाठी मातीचा भराव; खोदकामामुळे पाली भूतीवली धरणाला धोका
Follow Us
Close
Follow Us:
  • शासनाचा महसूल बुडवून कारशेडसाठी मातीचा भराव,
  • खोदकामामुळे पाली भूतीवली धरणाला धोका
कर्जत/संतोष पेरणे : परिसरात मध्य रेल्वेकडून कारशेड बांधण्यात येत आहे.सात ते आठ किलोमीटर भागात कारशेडचे बांधकामासाठी माती आणून टाकली जात आहे. ही माती पूर्वी भिसेगाव येथून आणली जात होती.मात्र शासनाचे स्वामित्व शुल्क भरले जात नसल्याची तक्रार समोर येऊ लागली. त्यानंतर आता या कारशेडच्या कामासाठी नवीन ठिकाणावरून माती काढण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान पाली भूतीवली धरणाचे पाणी अडवलेल्या डोंगराची दुसरी बाजू कारशेडच्या कामासाठी माती भरावसाठी खोदकाम सुरु आहे. या खोदकामांमुळे गावातील शेतकरी हतबल झाले आहेत. शेतजमिनीतून ही माती काढण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे.

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत दिशेकडे रेल्वे कडून कारशेड उभारले जात आहे.मध्य रेल्वे 2021 मध्ये वसई विरार भागात कारशेड उभे राहिल्यानंतर कर्जत मार्गावर नवीन कारशेड उभारण्यास मंजुरी दिली आहे.मध्य रेल्वेवरील सर्वात मोठे कारशेड बनणार असून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरात हे नवीन कारशेड असणार आहे.या कारशेडच्या कामाला सुरुवात झाली असून मातीचा भराव टाकून जमीन सपाट करण्याचे काम केले जात आहे. मात्र त्या कामासाठी बाहेरून आणली जाणारी माती सध्या चर्चेचा विषय बनली आहे.सध्या भिसेगाव भागातून माती आणली जात असून दररोज शेकडो ब्रास माती तेथे टाकण्यात येत आहे.मात्र बाहेरून उचलली जाणारी मातीसाठी शासनाच्या महसूल विभागाला स्वामित्व शुल्क म्हणजे रॉयल्टी भरावी लागते.परंतु भिसेगाव येथील मातीच्या खोदकामाला जेमतेम रॉयल्टी भरली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून रेल्वेच्या कामासाठी मातीचा भराव टाकला जात आहे. कारशेड साठी दररोज माती घेऊन येणाऱ्या ट्रकसाठी खास रस्ता बनविण्यात आला आहे,त्याच रस्त्यासाठी काही शे ब्रास माती लागली आहे.

Karjat News : तांत्रिक बिघाडाचा फटका; पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल, उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

भिसेगाव येथून काढली जाणारी माती ही अल्प रॉयल्टी भरून कारशेड चे ठिकाणी आणली जात होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्ररी केल्या आहेत. त्यानंतर आता डिकसळ येथील डोंगर फोडून माती काढली जात असून लोणावळा येथील ट्रक ती माती डिकसळ डोंगर येथून सावरगाव अशी वाहतूक करीत आहेत.या वाहतुकीस माती खोदकाम ज्या ठिकाणी केली जात आहे त्या डोंगराच्या मागील बाजूस पाली भूतीवली धरण शासनाने दीडशे कोटी रुपये खर्चून बांधले आहे. त्यामुळे धरणाच्या डोंगरात खोदकाम करून धरणाच्या जलाशयाला धोका निर्माण झाला आहे. त्याचवेळी माती ज्या ठिकाणावरून काढून वाहतूक केली जात आहे. त्या मातीबाबत देखील स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.त्याचवेळी शासनाला रॉयल्टी भरली आहे काय? हे देखील गुलदस्त्यात असून शासनाचा कर बुडवून तेर्थे माती उत्खनन केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.महसूल विभाग याबाबत काही हालचाली करणार आहे काय? असा सवाल स्थानिक चिंचवली गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Raigad News: राजकारण तापलं! विकासकामांचे आयते श्रेय घेऊ नका; शिंदे गटाच्या आमदारांचा इशारा

 

 

Web Title: Karjat news government revenue being wasted by filling up soil for car shed pali bhutivali dam in danger due to excavation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेचा पुन्हा कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका!
1

झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेचा पुन्हा कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका!

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?
2

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Ahilyanagar News: बंटी जहागीरदार दहशतवादीच! राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याचे भाजपा जिल्हाध्यक्षांकडून समर्थन
3

Ahilyanagar News: बंटी जहागीरदार दहशतवादीच! राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याचे भाजपा जिल्हाध्यक्षांकडून समर्थन

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ
4

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.