एसटीत चढताना तरुणाने काढली तरुणीची छेड; कराड बसस्थानकातील धक्कादायक प्रकार समोर
कराड : कराड येथील बसस्थानकामध्ये एसटीत चढताना तरुणीची छेड काढण्याचा प्रकार समोर आला. तरूणाने गर्दीचा गैरफायदा घेत एका युवतीची छेड काढली. त्यानंतर तरुणाला संबंधित युवतीनेच चोप दिला. भरगर्दीत युवतीने संबंधित युवकाला पकडून चोप दिल्यानंतर संबंधित युवक तेथून पसार झाला. निर्भया पथकाने त्याचा शोध सुरू केला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड बसस्थानकात विटा बाजूकडे जाणारी एसटी फलाटावर लागली होती. एसटीला गर्दी असल्याने महाविद्यालयीन मुलींसह इतर प्रवाशांनी एसटीत जाण्यासाठी दरवाजासमोर गर्दी केली. एसटीतील प्रवासी बाहेर उतरत असतानाच एसटीत जाण्यासाठी चढाओढ सुरू झाली. त्याचदरम्यान एक युवतीही एसटीत जाण्यासाठी गर्दीत उभी होती. त्या युवतीच्या मागे येत युवकाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला.
हेदेखील वाचा : Honey Trap Case Video: कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न
संशयिताने युवतीला वारंवार छेडण्याचा प्रयत्न करताच युवतीने मागे फिरत युवकाला चांगलाच चोप दिला. युवतीचा रूद्रावतार पाहून युवक तेथून पळू लागला. मात्र, तरीही युवतीने धाडसाने त्याचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत युवक तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या निर्भया पथकाने तेथे पोहचत संशयिताचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
डोंबिवलीत धक्कादायक घटना समोर
डोंबिवली येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. हाय प्रोफाईल सोसायटीत दोन मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याचे समोर आले. केवळ बॉल आत आला म्हणून त्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने दोन लहान मुलांचे हात बांधून त्यांना मारहाण केल्याचे समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : Dombivli News: डोंबिवलीत अमानुष कृत्य! बॉलसाठी गेलेल्या दोन मुलांना सुरक्षारक्षकाची क्रूरता, दोन मुलांचे हात बांधून मारहाण