Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PSI शारीरिक चाचणीचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करा; आमदार Gopichand Padalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पोलीस उपनिरीक्षक (Dept. PSI) शारीरिक चाचणीचे वेळापत्रक अडीच वर्षांपासून रखडल्याने उमेदवारांमध्ये संताप. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वेळापत्रक तात्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 05, 2026 | 09:08 PM
PSI शारीरिक चाचणीचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करा

PSI शारीरिक चाचणीचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करा

Follow Us
Close
Follow Us:

 

  • PSI शारीरिक चाचणीचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करा
  • आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सांगली : पोलिस उपनिरीक्षक (विभागीय) स्पर्धा परीक्षा २०२३ अंतर्गत होणाऱ्या शारीरिक चाचणीचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करावे, अशी मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ.संग्राम जगताप आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, पोलिस उपनिरीक्षक (Dept. PSI) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ (जाहिरात क्र. ४७/२०२३) ही प्रक्रिया गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली. पुढे डिसेंबर २०२४ मध्ये मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होऊन प्रक्रिया पुढे सरकली.

ऑक्टोबर २०२५ मध्ये मैदानी शारीरिक चाचणीचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र राज्यातील अतिवृष्टीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. नोव्हेंबर २०२५ मध्ये पुन्हा चाचणीचे नियोजन करण्यात आले होते; परंतु प्रशासकीय कारणास्तव ती अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली.

Gopichand Padalkar Song: “आमच्या नादाला लागण्याआधी…”; आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग, गाण्याने सोशल मीडियावर लावली आग!

दरम्यान नोव्हेंबर २०२५ पासून आजतागायत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) या संदर्भात कोणतीही नवी माहिती किंवा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. जाहिरात प्रसिद्ध होऊन आता मार्च २०२६ उजाडला असून जवळपास तीन वर्षे पूर्ण होत आली आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम व नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक उमेदवार पोलिस दलातील कर्तव्य पार पाडत असतानाच मागील १४ महिन्यांपासून शारीरिक चाचणीची तयारी करत आहेत. मात्र सातत्याने परीक्षा लांबणीवर पडत असल्याने उमेदवारांच्या वयोमर्यादा व शारीरिक क्षमतेसंदर्भातही प्रश्न निर्माण होत असल्याचे पडळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगास तात्काळ निर्देश देऊन डीपीएसआय शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

महाराष्ट्रातील नागरिक लवकरच परतणार मायदेशी; गिरीश महाजनांकडे सरकारने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Web Title: Immediately announce the schedule for psi physical test mla gopichand padalkar demands from the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • gopichand padalkar
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: पोलीस वसाहतीसाठी 25 कोटींची तरतूद, आमदार आशुतोष काळे यांची मोठी घोषणा
1

Ahilyanagar News: पोलीस वसाहतीसाठी 25 कोटींची तरतूद, आमदार आशुतोष काळे यांची मोठी घोषणा

Ahilyanagar News: आता लक्ष सभापतीपदाच्या निवडीकडे! स्थायी समितीवर कोणाला संधी मिळणार?
2

Ahilyanagar News: आता लक्ष सभापतीपदाच्या निवडीकडे! स्थायी समितीवर कोणाला संधी मिळणार?

व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण नीरा पोलिसांच्या सर्जिकल नाकाबंदीत सुखरूप सुटका
3

व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण नीरा पोलिसांच्या सर्जिकल नाकाबंदीत सुखरूप सुटका

मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार
4

मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.