Disha Salian Case News aaditya Thackeray press conference in mumbai
पुणे : मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी दोन-अडीच वर्षे केलेलं काम लोकांच्या समोर आहे. आम्ही ही निवडणूक स्वतःसाठी नव्हे तर राज्याच्या जनतेसाठी लढत आहोत. महायुतीकडून भ्रष्ट आणि गद्दारांचा चेहरा असणार की? चेहरा बदलणार? असा खाेचक प्रश्न शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.
हेदेखील वाचा : एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या बुलडाणा दौऱ्यावर; लाडकी बहीण योजना…
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील संवाद साधला. ते म्हणाले, आपल्याला जे पाहिजे आहे ते देवाला माहीत असते, मी फक्त बाप्पाच्या चरणी मनापासून नमस्कार करत असतो, असे त्यांनी सुरुवातीच्या प्रश्नावर उत्तर दिले. वरळी येथे हाेणाऱ्या राज ठाकरे यांच्या मेळाव्याविषयी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘त्यांना सगळीकडे येऊ द्या. सगळ्यांनी निवडणूक लढवली पाहिजे. निवडणूक ही निवडणुकीसारखी लढली पाहिजे, युद्धाप्रमाणे लढली नाही पाहिजे.’
राहुल गांधी यांच्याविरोधात संजय गायकवाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘यापूर्वी अनेकांनी अशी विधाने केली आहेत, यामुळे राज्यात गृहमंत्री नाहीये असेच वाटू लागले आहे. बदलापूरसारखी घटना, महिला पत्रकाराच्या बाबत विधान करणारे वामन म्हात्रे यांना अद्याप अटक झाली नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत.’
पुण्यात झालेल्या गोळीबार घटनेवर आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. ‘राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज राज्यात गृहमंत्री नसून विनागृहमंत्र्यांचे सरकार चालले आहे. असेच दिसत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : अकाली मृत्यू, मृत अविवाहित व्यक्ती, विवाहित व्यक्ती… कोणाचे श्राद्ध कोणत्या तिथीला करावे? जाणून घ्या नियम