Aana hajare gives reaction on Indus Water Agreement on Pahalgam attack
पुणे : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अशांतता निर्माण झाली आहे. पहलगाम सारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळावर लक्ष्य करण्यात आले. पर्यटकांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण देशातून रोष व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानवर कडक कारवाई करत सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक दिवसांनंतर आण्णा हजारे हे चर्चेमध्ये आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे हे देखील पूर्वी भारतीय सैन्यामध्ये होते. आता त्यांनी पहलगाम हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आण्णा हजारे हे अनेक दिवसांनंतर माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे समर्थन केले आहे. तसेच सिंधू जल करारला दिलेल्या स्थगितीचे देखील स्वागत करुन कडक कारवाईची मागणी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे करा क्लिक
सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे म्हणाले की, “पर्यटकांवर हल्ला करणं हा सर्वात मोठा दोष आहे. ते पर्यटक आहेत. ते तुमच्या हिंदुस्तान पाकिस्तान इथून आलेले नाहीत. त्यांचा संबंध नाही. त्यांच्याशी संबंध लावणं बरोबर नाही. सर्वात महत्त्वाच म्हणजे सिंधू नदीच पाणी जर थांबलं, नाक दाबलं तर तोंड उघडतं अशी म्हण आहे. नाक दाबलं तर तोंड आपोआप उघडेल म्हणून ही कृती करण गरजेच आहे” असे म्हणत अण्णा हजारे यांनी सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाच समर्थन केले आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यातील पीडितांबाबत वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, “हे लोक (सत्ताधारी) नेहमी भारत-पाकिस्तान असा जप करत असतात. त्यांनी आता सांगावं की या हल्ल्याची जबाबदारी कोणाची? हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश असल्याचं सरकारने स्वीकारावं. हे लोक काय बोलतात तर त्यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना मारले. अरे मुळात यासाठी वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जाऊन त्याच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला वेळ असतो का? यावरून बरेच वाद आहेत काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला, तर काहीजण म्हणत आहेत की असं काह घडलं नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किवा त्याची कुठलीही जात नसते,” असे मत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले होते. यावरुन राजकीय वाद निर्माण झाला होता. याबद्दल यांनी माफी मागितली आहे.