भारताच्या राजकारणात महिला नवी 'व्होट बँक' बनतायेत का? वाचा सविस्तर
गडचिरोली : राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली. जिल्हातील लाखो बहिणींनी अर्ज केले. या योजनेसाठी अंगणवाडीसेविकांनाही सहभागी करून घेण्यात आले. या बदल्यात त्यांना प्रत्येक लाभार्थीमागे 50 रुपये दिले जाणार होते. मात्र, बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र, अंगणवाडीसेविकांना अद्यापही एक रुपयादेखील मिळालेला नाही. यामुळे अंगणवाडीसेविकांमध्ये रोष दिसत आहे. अंगणवाडीसेवकांनी यासाठी आंदोलनही पुकारले होते.
हेदेखील वाचा : मंत्रिपदासाठी इच्छुकांचा मुंबई मुक्काम लांबला; यवतमाळचे सातही आमदार अधिवेशनासाठी मुंबईत
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू झाल्यानंतर अधिकाधिक महिलांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी अंगणवाडीसेविकांना प्रोत्साहन म्हणून 50 रुपये प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. अंगणवाडीसेविकांनी अंगणवाड्या सांभाळून गावागावात ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम केले. मात्र, या कामामध्ये दिलेल्या मोबाईलमधील नेटचा वेग कमी असल्याने असल्याने अर्ज भरताना अनेक अडथळेही आले. मात्र सर्व अडथळे पार करीत त्यांनी अर्ज भरले होते.
अंगणवाडी सेविकांना नियमित काम करण्याबरोबर अर्ज भरण्याचे काम दिल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला. नियमित कामाव्यतिरीक्त, शासनाच्या विविध उपक्रमामध्ये महत्वाची भूमिका बजावणे, शासनाच्या विविध योजना जना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे राष्ट्रीय काम आणि राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच बहूतांश राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, उपक्रमांमध्ये या सेविकांना समाविष्ट करण्यात येते.
अर्जाच्या फेरपडताळणीमध्ये होणार अनेकांचे अर्ज बाद?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत यापुढे पात्र महिलांना दरमहा 2100 रूपये देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, आतापर्यंत पात्र ठरलेल्या अर्जाची फेरपडताळणी करण्यात येणार असून, ज्या महिलांच्या कुटुंबियांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. येत्या काही दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती आहे.
लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देखील त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे निरक्षर व अल्पशिक्षित महिलांनी सेविकांकडून अर्ज भरून घेतले होते. आता सरकार स्थापन झाले असल्याने अंगणवाडी महिलांना त्यांचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी सेविकांमधून होत आहे.