Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक

राज्य शासनाने त्या संदर्भातील कार्यपध्दती व नियम अद्याप तयार केले नाहीत. त्यामुळे मंजूर झालेल्या मागणीची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 13, 2026 | 01:43 PM
विविध मागण्यांसाठी RTO कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

विविध मागण्यांसाठी RTO कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

Follow Us
Follow Us:

मुंबई : शासनाने कर्मचारी-शिक्षकांबाबत जी नकारात्मक भूमिका स्वीकारली आहे, त्याकडे शासनाचा लक्षवेध करण्यासाठी गुरूवारी राज्यातील ३६ जिल्ह्यांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचारी-शिक्षकांनी दोन तास धरणे-सत्याग्रह करुन उग्र निदर्शने केली. जिल्हानिहाय कर्मचारी-शिक्षकांचा आंदोलनातील सहभाग लक्षणीय होता. याउपरही राज्य सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास विधिमंडळाच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत सरकारी कर्मचारी-शिक्षक बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने केली.

राज्य सरकारने संघटनेला चर्चेसाठी पाचारण करावे. शासनाने कर्मचारी-शिक्षकांबाबत जी नकारात्मक भूमिका अंगिकारली आहे, त्याकडे शासनाचा लक्षवेध करण्यासाठी गुरूवारी राज्यातील ३६ जिल्ह्यांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचारी-शिक्षकांनी दोन तास धरणे-सत्याग्रह करुन उग्र निदर्शने केली. जिल्हानिहाय कर्मचारी-शिक्षकांचा आंदोलनातील सहभाग लक्षणीय होता. राज्यभर धरणे-सत्याग्रह आंदोलन पूर्णपणे यशस्वी होणे म्हणजे कर्मचारी-शिक्षकांची नाराजी उघड होणे होय. या लक्षवेधी कृतीचा शासनाने बोध घेऊन समन्वय समितीला निर्णायक चर्चेसाठी तत्काळ पाचारण करावे, अशी मागणी विश्वास काटकर आणि मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी केली आहे.

संबंधित योजना विधानसभेत मंजूर झाली. परंतु राज्य शासनाने त्या संदर्भातील कार्यपध्दती व नियम अद्याप तयार केले नाहीत. त्यामुळे मंजूर झालेल्या मागणीची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. केंद्र राष्ट्रीय सुधारित निवृत्ती वेतन शासकीय कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२५ पासून ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू झाला. परंतु, राज्यातील कर्मचाऱ्यांना अद्याप वंचित ठेवण्यात आले आहे. सध्या सुमारे २ लाख रिक्त पदे आहेत, ती भरावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

देशातील सुमारे २७ लाख वीज कर्मचारी गेले होते संपावर

केंद्र सरकारच्या प्रस्तावित विद्युत महाराष्ट्रात द्वारसभा, निदर्शने व काळ्याफिती कायदा (सुधारणा) २०२५, सार्वजनिक वीज कंपन्यांच्या खाजगीकरण आणि राष्ट्रीय वीज धोरण २०२६ च्या विरोधात देशातील सुमारे २७ लाख वीज कर्मचारी, अभियंते व कंत्राटी कामगार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपावर जाणार आहेत. हा संप देशातील प्रमुख १० ट्रेड युनियन, स्वतंत्र फेडरेशन, संयुक्त किसान मोर्चा, विविध राजकीय पक्ष तसेच वीज उद्योगातील सात प्रमुख संघटनांच्या ‘नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी’ च्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रसिटी एम्प्लॉईजने दिली.

हेदेखील वाचा : Electricity Supply : महाराष्ट्रातील 16,981 ऑफीसमध्ये 24 तास वीजपुरवठा राहणार बंद , काय आहे नेमकं कारण?

Web Title: Maharashtra government employees warn of another strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Employees Strike
  • Government Employees
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
1

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य
2

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय
3

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
4

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.