पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर अपघात; मद्यधुंद कारचालकाने पाच जणांना केले जखमी
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा रोडवरील सिद्धेवाडीनजीक दोन कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांना चिरडल्याची घटना समोर आली. यामध्ये चालकासह एकूण पाच जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती दिली गेली. यामध्ये सागर महाडिक, त्यांची पत्नी स्वाती महाडिक, मुलगी सायली महाडिक, मुलगा समर्थ महाडिक आणि चालक पटेल (सर्व रा. मंगळवेढा) तालुक्यातील बेगमपूर अशी अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
माढा तालुक्यातील परिते या गावातील कार (MH-१३ EC-९८४६) या कार चालकाचे नियंत्रण सुटून कार काही वाहनांना धडकली. यामध्ये गाडीतील पाच जण जखमी झाले आहेत. गाडीचे नियंत्रण सुटलेला गाडीचा चालक दारूच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दारूच्या नशेत असलेला कारचालक प्रकाश ज्ञानेश्वर कवडे हा कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे बाळुमामाचे दर्शन घेऊन येत असताना वाटेत आपल्या मित्रासोबत दारूची नशा केली.
दारू जास्त होताच त्या मित्रांना तिथेच सोडून भरधाव वेगाने पंढरपूरला येऊन मंगळवेढा या दिशेने आला. सिद्धेवाडीच्या गावानजीक असणाऱ्या सिद्धनाथ सभामंडपात भरधाव वेगाने आपली स्विफ्ट डिझायर गाडी सभा मंडपात घातली. सिद्धेवाडी गावातील नागरिक गोळा होऊन सभामंडपात गाडी का घातली? गावकऱ्यांनी विचारले असता प्रकाश कवडे हा गाडीतून खाली उतरला, पण लोकांच्या भीतीने तो नंतर गाडीत बसून गाडी लॉक केली. आणि त्याच स्पीडने गाडी रिव्हर्स घेतली. पण पाठीमागे असलेल्या लोखंडी खांबाला धडकली असता तो तसाच रिव्हर्सने वेग वाढवू लागला.
पण गाडी पाठीमागे जात नाही हे त्याच्या लक्षात आले. तेव्हा तो त्याच स्पीडने नंतर समोर सभा मंडपात गाडी घुसून सिने स्टाईलने आठ ते दहा फुटाच्या खड्ड्यामध्ये गाडी उडवून नदीपत्राकडे सुसाट नेली. नंतर पुढे रस्ता नाही, हे लक्षात आल्याने तो गाडी वळवून पुन्हा पंढरपूर रोडला येण्यासाठी निघाला असता रस्ता न दिसल्याने सैरावैरा देशील तिकडे दिशील तिकडे गाडी काढण्याचा प्रयत्न करू लागला. तो दारूच्या नशेत गाडी पळवत असल्याने सिद्धेवाडी गावातील लोक आरडाओरडा करत होते. तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. ज्या दिशेने आला, त्या दिशेने गाडीनंतर घेऊन तो पंढरपूर रोडला भरधाव वेगाने गेला.
सिद्धेवाडीतून पंढरपूर दिशेला दोन किलोमीटर अंतरावर जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडीनजीक ज्योतिबा, महालक्ष्मी कोल्हापूर दर्शन घेऊन पंढरपूर विठ्ठलचे दर्शन घेऊन येणाऱ्या (MH १३/BY ०८०८) गाडीला जोरात धडक दिली व या गाडीतील दोन महिला तीन पुरुष असे एकूण पाच व्यक्तींना जखमी केले.