Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव बस ट्रकला धडकली, एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी

अपघातानंतर प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केली होती. काही प्रवाशांना काचा फोडून बसच्या बाहेर काढण्यात आले. दरम्यान, किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 16, 2025 | 02:38 PM
Sangli News : बलवडी फाट्याजवळ भीषण अपघात; कारच्या धडकेत महिला पोलिसाचा मृत्यू

Sangli News : बलवडी फाट्याजवळ भीषण अपघात; कारच्या धडकेत महिला पोलिसाचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

धामणगाव रेल्वे : आष्टा गावातील चॅनल क्रमांक 10 जवळ ओव्हरटेकच्या नादात भरधाव ट्रॅव्हल्सने ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 10 प्रवासी जखमी झाले. बुधवारी (दि.15) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. संतोष राम परिहार (42, रा. येरवडा, पुणे) असे मृत ट्रॅव्हल्सचालकाचे नाव आहे. यामध्ये 10 प्रवासी जखमी झाले आहेत.

हेदेखील वाचा : “…धार्मिक कट्टरतावाद्यांकडून पूर्वनियोजित हा हल्ला”; सैफ अली खानवरील हल्ल्यावरुन राजकीय नेत्याचे गंभीर वक्तव्य

जखमींमध्ये गणेश भरत गोळे (19, रा. बाणेर), आर. एन. नीलेश बधगणे (23, रा. शिक्षकनगर, कोथरूड, पुणे), संतोष नामदेव शेलार (40, रा. अहमदनगर), दीपक पोपट शिंदे (31 रा. पुणे), योगेश राजकुमार ठगाणी (26 रा. दयालनगर, वर्धा), विनय अशोक मुकेवार (26, रा. ठक्कर कॉलनी, नवीना पार्क, चंद्रपूर), अनिता सतीश नायक (61 रा. लोधीपुरा, नागपूर), सुरेंद्र साहेबराव शिरसाठ (56, रा. वानाडोंगरी, हिंगणा रोड), सोनूकुमार साहू (23 रा. प्रयागराज), शाबा शेख मोहम्मद याहया शेख (30 रा. घाटकोपर, चिरागनगर, मुंबई) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

या घटनेच्या माहितीवरून मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमींना धामणगाव व पुलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. काही जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गालगत असलेल्या आष्टा गावातील चॅनल क्रमांक 90 जवळ हा अपघात झाला. ट्रॅव्हल्सचालकाने (एमपी-45/ झेडएफ-8849) ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला (एमएच 04/ जीएल- 0517) मागून धडक दिली. यात ट्रॅव्हल्सचालक संतोषचा जागीच मृत्यू झाला. तर 10 प्रवाशी गंभीर जखमी झाले. त्यांना धामणगाव रेल्वे व यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस घटनास्थळी दाखल

पहाटे झालेल्या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती. समृध्दी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार गौतम इंगळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. पहाटेची वेळ असल्याने ट्रॅव्हल्सचालकाला झोपेची डुलकी लागली अथवा ओव्हरटेक करण्याचा नादात हा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे.

काचा फोडून प्रवाशांना काढले बाहेर

अपघातानंतर प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केली होती. काही प्रवाशांना काचा फोडून बसच्या बाहेर काढण्यात आले. दरम्यान, किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. तर काही प्रवाशांना पुलगाव येथे दाखल करण्यात आले आहे. या ट्रॅव्हल्समध्ये 27 प्रवासी प्रवास करत होते.

Web Title: Accident on samruddhi highway one died nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • Accident on Samruddhi Highway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.