Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Solapurkar : अखेर अभिनेते राहुल सोलापूरकर यांची दिलगिरी! शिवाजी महाराजांबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अखेर शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून आता अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 04, 2025 | 11:16 PM
अखेर अभिनेते राहुल सोलापूरकर यांची दिलगिरी! शिवाजी महाराजांवर केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

अखेर अभिनेते राहुल सोलापूरकर यांची दिलगिरी! शिवाजी महाराजांवर केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

Follow Us
Follow Us:

ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून राज्यभर संतापाची लाट उसळली होती. नव्या वादाला तोंड फुटलं होतं. अखेर शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून आता अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली आहे.

ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, यासाठी शिवप्रेमींनी त्यांच्या घराबाहेर निदर्शने केली. पुढे वरिष्ठ पोलिसांच्या आदेशाने हे आंदोलन मागे घेण्यात आलं. कोथरूडमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आलं. शिवप्रेमींच्या आंदोलनानंतर राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली. राहुल सोलापूरकर यांनी फेसबुक लाईव्ह करत माफी मागितली.

शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. शिवरायांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता, असा खुलासा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. वादग्रस्त विधानावर राहुल सोलापूरकर यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका कशी झाली? याबाबत राहुल सोलापूरकर यांनी अजब दावा केला आहे. महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगेरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले, त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते बाहेर पडले, असे धक्कादायक विधान राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं.

शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. रोहित पवार म्हणाले की, “अडगळीत पडलेल्या एका अभिनेत्याने चर्चेत येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लाघ्य विधान केलं नाही ना? तसं नसेल तर या विधानामागील हेतू आणि सडका मेंदू कुणाचा आहे हे शोधणं गरजेचं आहे. काही वेडपट माणसं छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी चुकीची विधानं कुणाच्या आशीर्वादाने करतात?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी पुढे म्हणाले की, “महापुरुष हे केवळ महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी नाही तर सर्वांसाठीच पूजनीय आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी वादग्रस्त विधानं करणं थांबवलं पाहिजे, अन्यथा अशा महाभागांना मराठी माणूस जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही…” असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

Web Title: Actor rahul solapurkar apologizes over controversial statement on shivaji maharaj history marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 11:14 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • marathi actor

संबंधित बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना
1

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज
2

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत
3

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा
4

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.