Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prathamesh Parab: प्रथमेश परबची चौथ्या घरात गुंतवणूक; मुंबईत आणखी एका ठिकाणी साकारलं हक्काच्या घराचं स्वप्न

Prathamesh Parab: अभिनेता प्रथमेश परब आणि पत्नी क्षितिजा घोसाळकर यांनी मुंबईतील गोरेगावमध्ये चौथं घर बुक केलं आहे. सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने आनंद व्यक्त केला.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 09, 2026 | 02:13 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Prathamesh Parab : ‘टाइपास’, ‘बालक पालक’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब सध्या एका आनंदाच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. प्रथमेश आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकर यांनी मुंबईत आणखी एक घर खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे, प्रथमेशचं मुंबईतील हे चौथं घर असलं तरी पती-पत्नी म्हणून दोघांनी मिळून पहिल्यांदाच स्वतःचं घर बुक केलं आहे. या नव्या घराची आनंदाची बातमी प्रथमेशने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आहे.

प्रथमेशसाठी या घराचं महत्त्व केवळ आणखी एक प्रॉपर्टी खरेदी करण्यापुरतं मर्यादित नाही. कारण हे घर त्याने आणि क्षितिजाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर एकत्रितपणे खरेदी केलं आहे. त्यामुळे या घराशी त्यांच्या अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत. प्रथमेशने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या नव्या घराबद्दलचा आनंद व्यक्त केला आहे.

सायन, अंधेरी, मिरारोडनंतर आता गोरेगावमध्ये नवं घर!

प्रथमेशने २०१६ मध्ये मुंबईतील सायन येथे पहिलं घर खरेदी केलं होतं. त्यानंतर २०२० मध्ये अंधेरी आणि २०२३ मध्ये मिरारोड येथे घर घेतलं. आता २०२६ मध्ये पत्नी क्षितिजासोबत त्याने गोरेगावमध्ये चौथं घर बुक केलं आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. विशेष म्हणजे, याआधीही घरं खरेदी केली असली तरी नवरा-बायको म्हणून दोघांनी एकत्र घेतलेलं हे पहिलंच घर असल्याचं त्याने सांगितलं आहे.

 

‘त्या दिवशी गाडीत बसून डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते…’

प्रथमेशने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘मुंबई… City of Dreams! मोठं शहर, मोठी स्वप्नं आणि स्वतःचं एक हक्काचं घर… अशी स्वप्नं आम्हीही पाहिली होती. आयुष्यात घरं याआधीही घेतली, पण एक Couple म्हणून, नवरा-बायको म्हणून, दोघांनी मिळून पहिल्यांदा बुक केलेलं हे आमचं घर आहे! आणि खरं सांगायचं तर, ही भावना शब्दांत मांडणं खूप कठीण आहे.’

पुढे त्याने घर बुक केल्यानंतरचा भावुक क्षणही सांगितला. ‘ज्या दिवशी घर बुक केलं, त्या दिवशी बाहेर येऊन गाडीत बसलो आणि डोळ्यांतले अश्रू थांबतच नव्हते. आनंद होता, समाधान होतं, पण त्याहीपेक्षा मोठी भावना होती ती म्हणजे… आम्ही दोघांनी मिळून पाहिलेलं एक स्वप्न आज सत्यात उतरण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं होतं!’ असं त्याने म्हटलं.

तसंच, अजून घराचा ताबा मिळायचा असून चाव्या हातात यायच्या आहेत. त्यानंतर आपल्या आवडीनुसार घराचा प्रत्येक कोपरा सजवायचा आहे आणि त्या घरात असंख्य आठवणी तयार करायच्या आहेत, असंही प्रथमेशने सांगितलं.

पोस्टच्या शेवटी त्याने दिवाळीच्या आनंदासोबत आयुष्यात आलेल्या नव्या स्वप्नाचा उल्लेख केला. ‘या दिवाळीत रोषणाई तर खूप आहेच, पण आमच्या आयुष्यात एका नव्या स्वप्नाचा प्रकाशही आला आहे! कारण घर कितवं आहे यापेक्षा ते कोणासोबत आणि कोणत्या भावनेने घेतलंय, हे जास्त महत्त्वाचं असतं!’ अशा शब्दांत प्रथमेशने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Mirzapur The Movie OTT: सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू झाला खूनी खेळ; साडेतीन तासांचा चित्रपट ओटीटीवर ठरतोय प्रेक्षकांची पहिली पसंती

प्रथमेशच्या या पोस्टवर चाहते आणि मनोरंजनविश्वातील कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्याच्या आयुष्यातील या नव्या टप्प्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झाला असून चाहत्यांनीही त्याच्या नव्या घराच्या स्वप्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Sania Mirza Dating: सानिया मिर्झा पुन्हा प्रेमात पडलीय? दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण; डेटिंगबाबत दिलं मोठं संकेत

Web Title: Prathamesh parab fourth house goregaon with wife kshitija ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • entertainment
  • home
  • marathi actor

संबंधित बातम्या

Abhijeet Kelkar: ‘बिल्डरच्या गावगुंडांनी…’ अभिजीत केळकरने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
1

Abhijeet Kelkar: ‘बिल्डरच्या गावगुंडांनी…’ अभिजीत केळकरने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Mirzapur The Movie OTT:  सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू झाला खूनी खेळ; साडेतीन तासांचा चित्रपट ओटीटीवर ठरतोय प्रेक्षकांची पहिली पसंती
2

Mirzapur The Movie OTT: सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू झाला खूनी खेळ; साडेतीन तासांचा चित्रपट ओटीटीवर ठरतोय प्रेक्षकांची पहिली पसंती

Sania Mirza Dating: सानिया मिर्झा पुन्हा प्रेमात पडलीय? दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण; डेटिंगबाबत दिलं मोठं संकेत
3

Sania Mirza Dating: सानिया मिर्झा पुन्हा प्रेमात पडलीय? दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण; डेटिंगबाबत दिलं मोठं संकेत

Ramayana Movie Collection: ‘रामायणम्’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; दिवाळीत केली जोरदार कमाई, चार दिवसांत रचला नवा विक्रम
4

Ramayana Movie Collection: ‘रामायणम्’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; दिवाळीत केली जोरदार कमाई, चार दिवसांत रचला नवा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.