मोठी बातमी! अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश
मुंबई: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आह. येत्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. यातच आता प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सयाजी शिंदे यांनी पक्षात प्रवेश केला आहे. मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुलल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला आहे
अभिनेते सयाजी शिंदे यांनी सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य केले आहे. त्यामुळे आज आम्ही त्यांना यांच्या सोबत घेत असल्याचे प्रदेशहदयक्ष सुनील तटकरे म्हणाले. सयाजी शिंदे यांना झाडांची आवड आहे. सह्याद्री देवराईसाठी ते खूप चांगले काम करत आहेत. सयाजी शिंदे हे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम पाहतील, असे पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
उद्या दसरा आहे. मात्र आजच आम्हाला दसरा साजरा करण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे. सयाजी शिंदे हे नाव जारी मराठी असले तरी देखील त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मोठे नाव कमावले आहे. ते अभिनेते आहेतच. मात्र आता ते नेते होणार आहेत. कारण सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोठे कार्य केले आहे.