Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय

(DGCA) ने ‘VSR वेंचर्स’च्या चार विमानांच्या उड्डाणावर तात्काळ बंदी घालत त्यांना ‘ग्राऊंड’ करण्याचे आदेश दिले आहेत. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 25, 2026 | 01:07 PM
MLA Rohit Pawar Press conference on DGCA action on VSR plane company

MLA Rohit Pawar Press conference on DGCA action on VSR plane company

Follow Us
Follow Us:
  • DGCA चा ‘VSR वेंचर्स’च्या चार विमानांच्या उड्डाणावर तात्काळ बंदी
  • आमदार रोहित पवार यांनी दिली प्रतिक्रिया
  • रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूवर व्यक्त केल्या भावना
Maharashtra Politics : मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 फेब्रुवारी रोजी विमान अपघातामध्ये (Ajit Pawar Plane crash) निधन झाला. या विमान अपघात होता की घातपात यावरुन आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तीन पत्रकार परिषद घेतल्या असून अमोल मिटकरी देखील टीका करत आहेत. दरम्यान, विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) ने ‘VSR वेंचर्स’च्या चार विमानांच्या उड्डाणावर तात्काळ बंदी घालत त्यांना ‘ग्राऊंड’ करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष सुरक्षा ऑडिटमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र रोहित पवार यांनी उशीरा केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विधीमंडळाच्या आवारामध्ये आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ एका कुटुंबाचे नुकसान नसून तर तो संपूर्ण राज्यासाठी एक काळा दिवस होता. आजही अनेक सामान्य लोकांना प्रेमापोटी वाटते की दादा कुठेतरी बाहेर येतील आणि आपल्याला भेटतील. पण दुर्दैवाने तो दिवस येणार नाही, हे वास्तव आपल्याला स्वीकारावे लागेल. जनतेची आणि सामान्य लोकांची हीच इच्छा आहे की, या अपघातामागील सत्य समोर यावे. हा केवळ अपघात होता की घातपात? यात नक्की काय घडले? कुणी केले? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत,’ अशा भावना रोहित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुढे ते म्हणाले की, “लोक चहाच्या टपरीपासून सोशल मीडियापर्यंत या अपघातावर चर्चा सुरु आहे. आणि दादांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली जात आहे. २८ जानेवारीला जेव्हा अजित दादांचे पार्थिव रुग्णालयात होते, त्याच दिवशी दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी डीजीसीएने पहिला अहवाल दिला. या अहवालात लेव्हल १ ची कोणतीही अडचण नसल्याचे सांगून संबंधित विमान कंपनीला (VSR) क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला. ज्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करत आहोत, त्यांनीही दुर्दैवाने या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र काल आलेल्या अहवालात डीजीसीएने काही त्रुटी मान्य केल्या आहेत, पण ते यश नखाएवढे आहे,’ अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : शरद पवार हे निवडणुकीला उभे राहणार; राज्यसभा निवडणूकीवरुन मविआत वादंग? खासदार राऊत स्पष्टच बोलले

पुढे ते म्हणाले की, “कालच्या अहवालात त्यांना अनेक त्रुटी जाणवल्या. विमान उडवायच्या आधी त्याला एक सर्टिफिकेट असतं, त्यात त्यांना त्रुटी दिसल्या. त्याच्या सुरक्षेबद्दल त्रुटी दिसल्या. फ्लाईटमध्येही दिसल्या. तुम्ही आता जे बोलताय त्यातून एक नेता गेला. या रिपोर्टमध्ये आताही ते व्हिएसआरला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकार फक्त ॲक्शन घेतली आहे, असे दाखवत आहे. पण प्रत्यक्षात विमान कंपनीला त्यांच्या त्रुटी दुरुस्त करून पुन्हा विमान उडवण्याची अप्रत्यक्ष परवानगी दिली आहे,” असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Web Title: Mla rohit pawar press conference on dgca action on vsr plane company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • MLA Rohit Pawar

संबंधित बातम्या

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
1

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल
3

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
4

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.