Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News: पिंपरी-चिंचवडमध्ये खुड्डेमुक्त रस्ते, कोंडीमुक्त वाहतूक अन्‌ कचरा नियोजनासाठी प्रशासनाला डेडलाईन

PCMC News: बैठकीत शहरातील रस्ते आणि पदपथ खड्डेमुक्त करण्यावर विशेष भर देण्यात आला. पदपथ, दुभाजक, चौक आणि सर्कल परिसरातील सर्व खड्डे तातडीने बुजवून व्यापक खड्डेमुक्त मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 01, 2026 | 04:20 PM
PCMC News: पिंपरी-चिंचवडमध्ये खुड्डेमुक्त रस्ते, कोंडीमुक्त वाहतूक अन्‌ कचरा नियोजनासाठी प्रशासनाला डेडलाईन
Follow Us
Follow Us:
  • भाजपा आमदार महेश लांडगे यांचे बैठकीत कडक निर्देश
  • महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सोबत बैठक
PCMC News: पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते, वाहतूक, अतिक्रमण, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी कोंडी निर्माण झालेली आहे. तसेच, मोशीतील कचरा डेपोवर झालेल्या दुर्घटनेनंतर कचरा संकलन नियोजन कोलमडले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने तात्काळ आणि दीर्घकालीन उपायोजना कराव्यात. यासाठी प्रशासनाला महिनाभराची ‘‘डेडलाईन’’ देण्यात आली आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत भोसरी विधानसभा मतदार संघासह शहरातील नागरी समस्यांबाबत सविस्तर आढावा बैठक घेत प्रशासनाला ठोस आणि कालबद्ध उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांनी संयुक्तपणे काम करत प्रत्यक्ष पाहणी करून अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

PCMC DP Plan Hearing: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डीपी प्लॅनवरील ५६ हजार हरकतींवर ‘या’ तारखेपासून सुनावणी

 

यावेळी क-प्रभाग अध्यक्ष नगरसेवक निखिल बोऱ्हाडे, ई-प्रभाग अध्यक्षा अर्चना सस्ते, फ- प्रभाग अध्यक्षा शिवानी नरळे आणि ल- प्रभाग अध्यक्षा रेखा देवकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त निलेश देशमुख यांच्यासह पोलीस, वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील रस्ते आणि पदपथ खड्डेमुक्त करण्यावर विशेष भर देण्यात आला. पदपथ, दुभाजक, चौक आणि सर्कल परिसरातील सर्व खड्डे तातडीने बुजवून व्यापक खड्डेमुक्त मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटींची नोंद घ्यावी आणि त्यानुसार कामे पूर्ण करावीत, असेही स्पष्ट करण्यात आले. शहरातील बीआरटी मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले.

आवश्यकतेनुसार ‘नो व्हेईकल झोन’….

विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांची संपूर्ण यादी तयार करून नियोजनबद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. नाशिक फाटा ते दापोडी या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तातडीचा आराखडा तयार करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. पुलांवर आणि मुख्य रस्त्यांवर विनाकारण वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, नो पार्किंग नियमांची प्रभावी अंमलबजावणी, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक उभारणे तसेच गरजेनुसार ‘नो व्हेईकल झोन’ आणि जड वाहनांवर निर्बंध लागू करण्याबाबतही चर्चा झाली. दुकानदारांनी स्वतःच्या ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने पीएमपीएमएल बससेवेत आवश्यक त्या मार्गांवर फेऱ्या वाढविणे, बसथांबे आणि रिक्षा थांबे योग्य ठिकाणी स्थलांतरित करणे, बस वेळेवर धावण्यासाठी नियोजन करणे आणि बसथांब्यावरूनच बसेस सुटतील याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.

Abhijeet Dipke: टायफॉईडनंतर पुन्हा प्रकृती खालावली? अभिजीत दिपकेंच्या घरी डॉक्टरांचं पथक दाखल; नेमकं का

प्रशासकीय समन्वय वाढीवर भर…

प्रशासकीय समन्वय वाढविण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. प्रभाग अधिकारी, प्रभाग अध्यक्ष, वाहतूक पोलिस अधिकारी, महापालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी संयुक्त पाहणी करून प्रत्येक समस्येवर कृती आराखडा तयार करावा, असे आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले. संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून नव्हे तर प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन समस्यांची पाहणी करून उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी बजावले. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. रस्त्यावरील पाणीगळती किंवा पाणीचोरीच्या घटनांची चौकशी करून तातडीने उपाययोजना कराव्यात. साईनाथ हॉस्पिटल परिसरातील स्वच्छता सुधारावी तसेच महामार्गालगत पाणी साचणाऱ्या ठिकाणी योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जनजागृती आणि शिस्त निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

नागरी सहभाग वाढण्यासाठी जनजागृती

शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी संरक्षक उपाययोजना करणे, अडथळा ठरणारे वीजखांब महावितरणच्या समन्वयातून हलविणे तसेच ओव्हरहेड आणि इतर पायाभूत सुविधांच्या देखभालीची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीच्या शेवटी आमदार महेश लांडगे यांनी वाहतूक शिस्त, रस्ते सुरक्षा आणि नागरी जबाबदारीबाबत सातत्याने जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली. नागरिकांना नियमांची माहिती देऊन त्यांचा सहभाग वाढविल्यास शहरातील अनेक समस्या कायमस्वरूपी सोडविणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. प्रशासनाने या सर्व कामांचा नियमित आढावा घेत अंमलबजावणीला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

“पिंपरी-चिंचवडकरांना सुरक्षित, स्वच्छ, वाहतूक कोंडीमुक्त आणि दर्जेदार नागरी सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. रस्ते, पदपथ, अतिक्रमण, पार्किंग, सार्वजनिक वाहतूक आणि स्वच्छता या प्रत्येक विषयावर केवळ बैठका नकोत, तर प्रत्यक्ष कामे दिसली पाहिजेत. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी तातडीने दूर कराव्यात. कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा अथवा दिरंगाई सहन केली जाणार नाही, अशी सक्त सूचना केली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

 

 

 

 

 

 

Web Title: Administration set a deadline for pothole free roads congestion free traffic and waste management in pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 04:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.