
Administration's preparations for Vadgaon Maval local body elections complete Pune News
मतदानाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून निवडणूक विभागाने सर्व मतदान यंत्रांची प्रथम तांत्रिक तपासणी करून त्यांचे सीलिंग केले. त्यानंतर निर्धारित प्रोटोकॉलनुसार १०% मतदान यंत्रांवर १००० अभिरूप मतदान (Mock Poll) घेण्यात आले. मॉकपोल दरम्यान सर्व यंत्रांची कार्यप्रणाली समाधानकारक असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या तपासणीवेळी सुनील माळी, निवडणूक निरीक्षक अधिकारी मनिषा तेलभाते, निवडणूक निर्णय अधिकारी.प्रविण निकम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी याशिवाय मतदान क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक, वडगाव नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी उपस्थित होते.
१ डिसेंबरला मतदान पथकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दि १रोजी मतदानाकरिता नियुक्त पथकांना EVM हाताळणी, मतदान प्रक्रिया, नियंत्रण युनिटचे संचालन, बॅलट युनिटवरील मतदार मार्गदर्शन, तक्रार नोंदणी आणि आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजना याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले जाणार आहे.
सर्व साहित्य दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान पथकांकडे सुपूर्द केले जाईल. त्यानंतर पोलिस बंदोबस्तासह मतदान केंद्रांवर पथके रवाना होतील.
२४ मतदान केंद्रे तयार आहेत. आदर्श व महिला केंद्र नामांकित आहेत. तसेच मतदान केंद्र परिसरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. वडगाव नगरपंचायत हद्दीत एकूण १९,८४७ मतदार नोंदणीकृत असून त्यापैकी,महिला मतदार ९ हजार ६७९ आहेत. तर पुरुष मतदार १० हजार १६८ आहेत. १९,८४७ मतदारांची तयारी करण्यात आली आहे.
वडगाव नगरपंचायत क्षेत्रासाठी एकूण १७ प्रभागांमध्ये २४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून ती पुढील ठिकाणी आहेत:
1. जि.प. प्राथमिक शाळा, केशवनगर
2. जि.प. प्राथमिक शाळा, कातवी
3. रमेश कुमार सहानी इंग्लिश मिडीयम स्कूल
4. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय
5. न्यू इंग्लिश स्कूल, वडगाव
6. पोदार इंटरनॅशनल स्कूल
यातील —
रमेश कुमार सहानी शाळा – खोली क्र. ७/२ : आदर्श मतदान केंद्र
जि.प. प्रा. शाळा, केशवनगर – खोली क्र. १/१ : महिला मतदान केंद्र
मतदान प्रक्रिया
मतदारांसाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोन बटणे दाबल्याशिवाय मतदान पूर्ण नाही. एकाच बॅलेट युनिटवर दोन मतपत्रिका असतील. गुलाबी मतपत्रिका ही नगराध्यक्ष पदासाठी तर पांढरी मतपत्रिका ही नगरसेवक पदासाठी असणार आहे. मतदाराने बॅलेट युनिटवरील दोन्ही पदांच्या उमेदवारांपैकी प्रत्येकी एक बटण दाबल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण मानली जाईल.
भावकीतील वाद जवळून पाहिलाय..; राणे बंधूंच्या कडाक्याच्या वादात रोहित पवारांची उडी
मतमोजणी ही दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरु होईल. या निवडणुकीची मतमोजणी बुधवार, दि. ३ डिसेंबर २०२५, सकाळी १०.०० पासून वडगाव नगरपंचायत कार्यालयात सुरू होणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये १०० मीटर परिसरात बंदी असणार आहे. यामध्ये ध्वनीक्षेपक, दुकाने, मोबाईल उपकरणांवर निर्बंध असणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांच्या दि. २४/११/२०२५ आदेशानुसार मतदान दिवशी (सकाळी ७.३० ते मतदान संपेपर्यंत) आणि मतमोजणी दिवशी (सकाळी ६ पासून मतमोजणी संपेपर्यंत) मतदान केंद्र वा मतमोजणी केंद्रापासून १०० मीटर परिसरात काही गोष्टींवर संपूर्ण बंदी असेल. यामध्ये व्यापारी आस्थापने, मंडपे,मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके,फेरीवाले खाजगी वाहने (निवडणूक कामाशी संबंधित वाहन वगळता) प्रचार साहित्य, चिन्हांचे प्रदर्शन उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ नुसार दंडनीय कारवाई होईल.
नगरपंचायतचे आवाहन — लोकशाही बळकट करा
वडगाव नगरपंचायत प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. सर्व नागरिकांनी अत्यंत उत्साहाने मतदान करून लोकशाही मजबूत करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.