मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांत रेराच्या नोंदणी (RERA Registration) क्रमांकांशिवाय गृह प्रकल्पांची जाहिरात करणाऱ्या बिल्डरांना रेरानं दणका दिला आहे. सुमारे १९७ गृहनिर्माण प्रकल्पांच्या अशा जाहिरात करण्यात आल्याचं समोर आलंय. या बिल्डरांना महारेरानं नोटिसी (MahaRERA) बजावलेल्या आहेत. ५०० चौरस मीटरपेक्षा अधिक आणि ८ फ्लॅट्सपेक्षा अधिक फ्लॅट असलेल्या ब्लिडिंगना महारेराची नोंदणी आवश्यक आहे. हा नोंदणी क्रमांक जाहिरातीत टाकणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे.
बड्या बिल्डरांना बजावण्यात आल्या नोटिसा
यात फिओनिक्स ग्रुप, कोहिनूर ग्रुप, रॉयल पाम इस्टेट, सांघवी ग्रुप यासारख्या नामवंत बिल्डर्सचा समावेश आहे. राज्यात केलेल्या पाहणीत मुंबईतील 82, पुण्यात 86 आणि नागपुरात 29 जाहिरातीत महारेराचा नोंदणी क्रमांक नसल्याचं समोर आलेलं आहे.
बिल्डरांना लाखोंचा होणार दंड
अशाप्रकारे नियम न पाळणाऱ्या बिल्डर आणि गृहनिर्माण प्रकल्पांवर कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी 197 प्रकरणांपैकी 90 प्रकरणांत सुनावणी पार पडली असून, त्यात 18.30 लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. आता उर्वरित प्रकरणातही अशीच कारवाई होण्याची शक्यता आहे.