Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Z.P. School Ganori: जि.प. गणोरी शाळेची राष्ट्रीय स्तरावर झेप; पर्यावरणपूरक कुंड्या प्रकल्पाचा नागपुरात सन्मान

गणोरी जिल्हा परिषद शाळेने ५३ व्या राज्य विज्ञान प्रदर्शनात बाजी मारली आहे. 'पर्यावरणपूरक कुंड्या' या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते शाळेचा गौरव करण्यात आला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 16, 2026 | 04:24 PM
जि.प. गणोरी शाळेची राष्ट्रीय स्तरावर झेप (Photo Credit- X)

जि.प. गणोरी शाळेची राष्ट्रीय स्तरावर झेप (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • जि.प. गणोरी शाळेची राष्ट्रीय स्तरावर झेप
  • पर्यावरणपूरक कुंड्या प्रकल्पाचा नागपुरात सन्मान
नागपूर येथे झालेल्या ५३ व्या राज्य विज्ञान प्रदर्शनात पीएमश्री जिल्हा परिषद प्रशाला गणोरीची शाळा राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. नागपूरच्या शिवाजी महाविद्यालय, काँग्रेस नगर येथे झालेल्या राज्य विज्ञान संस्थेच्या राज्यस्तरीय प्रदर्शनात हा प्रकल्प राज्यातून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक सहभागासाठी निवडला आहे. यशस्वी बालवैज्ञानिक दक्षिणी गजानन चंद्रे आणि मार्गदर्शक शिक्षिका एस. डी. नाईकवाडे यांनी शाळेच्या वतीने महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते नागपुरात हा पुरस्कार स्वीकारला. जिल्हा परिषद प्रशालेने अशा स्वरूपाचा बहुमान मिळवावा अशी ही राज्य विज्ञान प्रदर्शनाच्या इतिहासात घडलेलली पहिलीच घटना आहे.

‘आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम तंत्रज्ञान’ विषय

गतवर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे उपकरण राष्ट्रीय स्तरावर पोहोचले होते, या पार्श्वभूमीवर सतत दुसऱ्या वर्षी हा सन्मान जिल्ह्याला मिळाला आहे. विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम तंत्रज्ञान असा या प्रदर्शनाचा मुख्य विषय होता. कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय या उपविषयाअंतर्गत रोपवाटिकांसाठी पर्यावरण पूरक कुंड्या हा प्रकल्प शाळेने सादर केला होता. मागील काही महिन्यांपासून या प्रकल्पाद्वारे पद्धतशीर कृती, संशोधन आणि अभ्यास करत पर्यावरण संरक्षणाचा उद्देश ठेवून या कुंड्यांच्या वापरामुळे जमीन पाणी आणि हवेच्या प्रदूषणावर होणारी परिणामकारकता अभ्यासली गेली.

JEE MAIN 2026 च्या निकालाची प्रतिक्षा संपली? या संकेतस्थळावर पाहा निकाल, जाणून घ्या सविस्तर…

शिक्षणाधिकारी, जयश्री चव्हाण म्हणाल्या की, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात केवळ गणोरी प्रशालाच नव्हे तर सर्वच शाळा उत्तम कामगिरी बजावत आहे. याचे संपूर्ण श्रेय विद्यार्थ्यांसाठी सातत्याने खूप चांगले प्रयत्न करत असलेल्या आमच्या मेहनती शिक्षकांना जाते. या यशाकरिता गणोरी शाळेचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

विज्ञान शिक्षिका एस. डी. नाईकवाडे यांनी म्हटले आहे की, कल्पकता, सृजनशीलता, क वैज्ञानिक समज, प्रकल्पातील नाविन्य, समाजाच्या दृष्टीने उपयोगीता अशा मूल्यमापनाच्या सर्व कसोट्यावर टिकणाऱ्या प्रकल्पाला मला मार्गदर्शन करता आले. योग्य दिशा दिली की विद्यार्थी मोठी कामगिरी बजावतात है यातून सिद्ध होते.

मान्यवरांनी केले शाळेचे कौतुक

पोषक द्रव्य आणि खताची उपलब्धता होणे, सूक्ष्म जीवांची वाढ आणि या कुंड्यांचा घर, शाळा, रोपवाटिका या ठिकाणची सहज उपलब्धता यांचा संशोधनात्मकरित्या अभ्यास सुरू होता. ठराविक कालावधीनंतर नैसर्गिक रित्या विघटन होणाऱ्या कुंड्या निसर्गात उपलब्ध होणाऱ्या विघटनशील कचऱ्यापासून विशिष्ट प्रक्रियेद्वारे बनवल्या होत्या. या यशाबद्दल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित सर, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाठकर, गटविकास अधिकारी उषा मौरे, गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन, यांनी अभिनंदन केले आहे.

हौसलों से उड़ान होती है! दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हात नसलेला सूरज उबाळे पायाने लिहितो पेपर

Web Title: Zp ganori school leaps to national level eco friendly kundya project honored in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Nagpur
  • School

संबंधित बातम्या

मराठवाड्याचा डंका! गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेत साकारणार राज्याची पहिली ‘AI प्रयोगशाळा’; ग्रामीण मुले गिरवणार तंत्रज्ञानाचे धडे
1

मराठवाड्याचा डंका! गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेत साकारणार राज्याची पहिली ‘AI प्रयोगशाळा’; ग्रामीण मुले गिरवणार तंत्रज्ञानाचे धडे

सिंचन महामंडळाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! शेतकऱ्यांना प्रवेशद्वारावरच रोखले; पोलिसांच्या अरेरावीविरोधात ‘बुलंद छावा’ आक्रमक
2

सिंचन महामंडळाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! शेतकऱ्यांना प्रवेशद्वारावरच रोखले; पोलिसांच्या अरेरावीविरोधात ‘बुलंद छावा’ आक्रमक

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘भाजीत केस’ कारण ठरलं जीवावर! रात्रभर निर्दयी मारहाण, 25 वर्षीय महिलेने संपवले आयुष्य
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘भाजीत केस’ कारण ठरलं जीवावर! रात्रभर निर्दयी मारहाण, 25 वर्षीय महिलेने संपवले आयुष्य

पर्यटनाला नवी दिशा! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे; सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ५ ठिकाणांचा शोध
4

पर्यटनाला नवी दिशा! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे; सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ५ ठिकाणांचा शोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.