Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपुर हादरलं! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

नागपूर येथे भाजप नगरसेविकेच्या पती नितीन शिमले यांच्यावर पैशाच्या जुन्या वादातून चाकूने प्राणघातक हल्ला झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू असून आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 16, 2026 | 08:16 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नागपुरातील जुनी शुक्रवारी परिसरात रविवारी रात्री हल्ला
  • नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले गंभीर जखमी
  • धारदार शस्त्राने हल्ला करून आरोपी फरार
नागपूर: नागपुरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास जुनी शुक्रवारी परिसरात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून तपासाला सुरुवात केली आहे.

Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…

काय घडलं नेमकं?

भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आलाय. नितीन शिमले आणि आरोपी सोनू ठाकरे उर्फ पैलवान यांच्यात पैश्याच्या व्यवहारातून वाद झाला. त्यानंतर सोनू पैलवानने रविवारी रात्री जुनी शुक्रवारी चौकात नितीन शिमले याच्यावर चाकुने हल्ला केला. या हल्ल्यात शिमले गंभीर जखमी झाले. हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. नितीन शिमले यांना रुग्णालयात दाखल केले. जुन्या वादातून मित्र महेश ठाकरेने नितीन शिमले यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे म्हंटले जात आहे. जुन्या हत्येच्या प्रकरणात नितीन शिमले व महेश ठाकरे आरोपी होते. हल्ल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी शुक्रवारी परिसरात घडली. पोलीस या घटनेचा तपास करत असून फरार असलेला आरोपी सोनू पैलवानचा शोध पोलीस घेत आहे.

अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि…; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार

नागपूर येथून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ फेब्रुवारी रोजी घडली. मुख्य आरोपी हा पीडितेच्या मैत्रिणीचा भाऊ असून तो १२ विचा विध्यार्थी आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह ३ मुलांना बेड्या ठोकल्या आहे. तीन आरोपींपैकी दोघे अल्पवयीन आहेत. या घटनेने तीनही आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास सुरु

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींनी अत्याचाराचा व्हिडीओ खरोखर काढला का? याचा तपास करत आहेत. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांकडून तिन्ही आरोपींचा तपास करण्यात येत आहे. सर्वांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेने महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हादरला आहे. सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Bihar Crime: वरिष्ठ महिला वकिलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह; संशयास्पद मृत्यूने खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ला कुठे घडला?

    Ans: नागपुरातील जुनी शुक्रवारी परिसरात ही घटना घडली.

  • Que: हल्ल्याचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: पैशाच्या व्यवहारावरून जुना वाद असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Que: जखमींची प्रकृती कशी आहे?

    Ans: नितीन शिमले गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Nagpur crime nagpur shaken bjp corporators husband attacked in nagpur seriously injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

नागपुरात हत्येचा थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या
1

नागपुरात हत्येचा थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !
2

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या
3

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग
4

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.