Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल 30 वर्षांनी शाळांच्या रचनेत केला गेला मोठा बदल; आता केंद्रप्रमुख होणार ‘समन्वयक’

याशिवाय, प्रत्येक समूह साधन केंद्राखाली स्थानिक परिस्थितीनुसार किमान ८ ते कमाल २० शाळा संलग्न राहतील. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ व नक्षलग्रस्त भागात ६ ते ७ शाळांसाठीही एक समूह साधन केंद्र स्थापन करता येईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 27, 2025 | 01:24 PM
तब्बल 30 वर्षांनी शाळांच्या रचनेत केला गेला मोठा बदल; आता केंद्रप्रमुख होणार 'समन्वयक'

तब्बल 30 वर्षांनी शाळांच्या रचनेत केला गेला मोठा बदल; आता केंद्रप्रमुख होणार 'समन्वयक'

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील शाळांच्या रचनेत तब्बल तीस वर्षांनंतर मोठा बदल करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील केंद्र शाळांना आता समूह साधन केंद्र असे नाव देण्यात आले आहे. तर केंद्रप्रमुख पदाचे नामांतर करून त्यांना समूह साधन केंद्र समन्वयक असे संबोधले जाणार आहे. राज्यातील ४ हजार ८६० समूह साधन केंद्रांची पुनर्रचना करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून, या संदर्भातील शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

१९९४ मध्ये प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण साध्य करण्यासाठी प्रत्येक १० शाळांमागे एक केंद्र शाळा स्थापन करण्यात आली होती. या केंद्र शाळांचे कार्य म्हणजे आसपासच्या प्राथमिक शाळांना शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन देणे. मात्र, गेल्या तीन दशकांत शिक्षण क्षेत्रात झालेले आमूलाग्र बदल आणि समग्र शिक्षण योजनेच्या सुधारित आराखड्यातील तरतुदी लक्षात घेऊन ही रचना नव्याने आखण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समूह साधन केंद्रांवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

यात प्रत्येक शाळेला सक्षम करणे व प्रशासकीय संशोधनात्मक मदत पुरवणे, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग सुनिश्चित करणे, प्रभावी अध्यापनासाठी शैक्षणिक प्रतिमाने तयार करणे व शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थी गळती शून्यावर आणणे आणि प्रवेश कायम ठेवणे, शाळाबाह्य व स्थलांतरित विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे.

याशिवाय, प्रत्येक समूह साधन केंद्राखाली स्थानिक परिस्थितीनुसार किमान ८ ते कमाल २० शाळा संलग्न राहतील. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ व नक्षलग्रस्त भागात ६ ते ७ शाळांसाठीही एक समूह साधन केंद्र स्थापन करता येईल. तब्बल तीन दशकानंतर हा बदल होत आहे.

रिक्तपदे तत्काळ भरण्याची मागणी

राज्यातील केंद्रप्रमुख अर्थात आता समूह साधन केंद्र समन्वयकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. शासन निर्णयानुसार ही पदे ५० टक्के कार्यरत शिक्षकांमधून तर उर्वरित ५० टक्के सरळ भरतीद्वारे भरणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक वर्षांपासून सरळ भरती झालेली नसल्याने रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

Web Title: After 30 years a major change has been made in the structure of schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • Maharashtra school
  • Mumbai News
  • School Education

संबंधित बातम्या

विरारमध्ये मोठी दुर्घटना ! चार मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
1

विरारमध्ये मोठी दुर्घटना ! चार मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

29 ऑगस्टला महाआंदोलन! कुठे असणार मनोज जरांगेचा मुक्काम, Roadmap एकदा पहाच आणि मग निघा घराबाहेर
2

29 ऑगस्टला महाआंदोलन! कुठे असणार मनोज जरांगेचा मुक्काम, Roadmap एकदा पहाच आणि मग निघा घराबाहेर

Maratha Reservation: मोठी बातमी! मुंबईत येण्याआधीच जरांगे-पाटलांना मोठा धक्का; हायकोर्टाने केली आंदोलनास मनाई
3

Maratha Reservation: मोठी बातमी! मुंबईत येण्याआधीच जरांगे-पाटलांना मोठा धक्का; हायकोर्टाने केली आंदोलनास मनाई

Devendra Fadnavis: “… यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
4

Devendra Fadnavis: “… यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.