Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात…”: Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हा भारताच्या भविष्यातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असून 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 18, 2026 | 09:41 PM
“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात…”: Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
Follow Us
Close
Follow Us:

फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन
उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार
उद्योग, निर्यात आणि संपूर्ण व्यावसायिक परिसंस्थेला मोठा फायदा

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्सने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचे महत्त्वपूर्ण प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फेडेक्सची जागतिक स्तरावरील मजबूत उपस्थिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रातील कार्गो हाताळणी आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात भारतातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक व्यग्र प्रवासी व कार्गो विमानतळ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई, नवी क्षमता – जागतिक लॉजिस्टिक्समध्ये महाराष्ट्राची गरुड झेप! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स हबचे भूमिपूजन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा केवळ भूमिपूजन समारंभ नसून भारत, मुंबई आणि महाराष्ट्रातील… pic.twitter.com/Dgvc78YuHG — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 18, 2026

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हा भारताच्या भविष्यातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असून 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देईल. पुरवठा व्यवस्थापन खर्च कमी करणे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असून फेडेक्ससारख्या कंपन्यांमुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा खर्च कमी होण्यास मदत होईल. महाराष्ट्र हा देशाच्या उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असून फेडेक्सच्या सुविधेमुळे उद्योग, निर्यात आणि संपूर्ण व्यावसायिक परिसंस्थेला मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा

प्रास्ताविक भाषणात अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि.चे संचालक जीत अदानी म्हणाले की, फेडेक्सने नवी मुंबईची केंद्र म्हणून केलेली निवड ही महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचे प्रतीक आहे. विमानतळाचे जवाहरलाल नेहरू बंदर जवळील धोरणात्मक ठिकाण आणि अत्याधुनिक कार्गो सुविधा यामुळे हे हब जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरेल. या प्रकल्पामुळे निर्यातदार, लघु-मध्यम उद्योग, औषध व कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी थेट जोडणी मिळेल. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

फेडेक्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या पूर्णपणे स्वयंचलित आणि अत्याधुनिक एअर कार्गो हबचे भूमीपूजन हा भारताच्या जागतिक व्यापार जोडणीतील महत्त्वाचा टप्पा आहे. फेडेक्सचा हा भारतातील पहिलाच हब असून, ३ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह उभारला जाणार आहे. फेडेक्सकडून या प्रकल्पात २५० दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक दीर्घकालीन गुंतवणूक करण्यात येत असून, भारताच्या वाढत्या आर्थिक क्षमतेवरील विश्वासाचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Cm devendra fadnavis said about new mumbai international airport in fedex cargo hub event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Mumbai News
  • Navi Mumbai International Airport

संबंधित बातम्या

Ahilyanagar Irrigation: मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! अहिल्यानगर, श्रीगोंद्यातील ३२ दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला
1

Ahilyanagar Irrigation: मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! अहिल्यानगर, श्रीगोंद्यातील ३२ दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला

आता LPG गॅस सिलेंडरला करा ‘बायबाय’; तुमच्याही घरात पाईपने येणार गॅस तोही PNG
2

आता LPG गॅस सिलेंडरला करा ‘बायबाय’; तुमच्याही घरात पाईपने येणार गॅस तोही PNG

“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha  यांचे विधान
3

“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha यांचे विधान

ST Bus चा प्रवास सुलभ, डिजिटल होणार; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते ‘या’ कार्डचे लोकार्पण
4

ST Bus चा प्रवास सुलभ, डिजिटल होणार; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते ‘या’ कार्डचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.