अहमदाबादनंतर आता नागपुरातही येणार बुलेट ट्रेन; रेल्वेमंत्र्यांचे संकेत
नागपूर : सध्या महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मेट्रो धावत आहे. दुसरीकडे, अहमदाबादसारख्या शहरातून बुलेट ट्रेन धावत आहे. असे असताना आता देशातील पहिल्या हायस्पीड मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. ताशी 320 ते 350 किमी वेगाने धावणारी बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे 508 किमीचे अंतर अवघ्या 2 ते 2.30 तासांत पूर्ण करणार आहे. याबाबतचे संकेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिले.
हेदेखील वाचा : Nagpur Winter Session 2024 : अखेर ठरलं! हिवाळी अधिवेशन नागपुरात ‘या’ तारखेपासून होणार सुरु
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 12 बुलेट ट्रेन स्थानकांची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. या मार्गानंतर नागपूर-मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचेही काम होईल, ज्याचा अन्य 7 मार्गामध्ये समावेश करण्यात आला आहे, असे संकेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून दिले.
एनएचएसआरसीएलकडे जबाबदारी
मुंबई-अहमदाबादनंतर आणखी अनेक मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्याची योजना आखण्यात आली आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे आणखी 7 हायस्पीड मार्गाबद्दल विचारणा केली आहे. ते यापैकी दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-हावडा बुलेट ट्रेन उत्तर प्रदेशातून जातील. परंतु, हे कॉरिडॉर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर म्हणून तात्पुरते असतील.
कॉरिडॉर अधिक महाग?
कॉरिडॉर अधिक महाग असू शकतात. कोणत्याही हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरला मंजुरी देताना डीपीआरचा प्रभाव, तांत्रिक व्यवहार्यता, खर्च, आर्थिक बांधिलकी आणि संसाधनांच्या गोष्टी विचारात घेतल्या जातात.
21 किमी लांबीचा बोगदा बांधणार
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत बोलायचे तर त्यासाठी एकूण 1389 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. आतापर्यंत 336 किमी पिअर फाउंडेशन, 331 किमी पिअर बांधकाम, 260 किमी गर्डर कास्टिंग आणि 225 किमी गर्डर लॉन्चिंगचे काम पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्रात सुरू होणार दुसरा कारखाना
पुढील वर्षी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि डहाणूदरम्यान आणखी एक कारखाना उभारला जाईल, जिथे या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात ट्रॅक टाकण्यासाठी स्लॅब तयार केले जातील. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या ट्रॅक स्लॅब कारखान्यासाठी फेब्रुवारी 2025 पर्यंत निविदा काढल्या जातील, त्यानंतर महाराष्ट्रात त्याचे स्थान ठरवण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाईल.
हेदेखील वाचा : Mumbai Temperature: मुंबई कुडकुडली! येत्या 24 तासांत थंडीचा जोर वाढणार, 9 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद