Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीराजे छत्रपतींचे आंदोलन यशस्वी; विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन सुरू केले होते. पण दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आणि याठिकाणी दोन गटात तुफान दगडफेक, जाळपोळ झाली. अनेकांची घरेही यात जळून खाक झाली. पण या घटनेत मुस्लीम समाजाला  टार्गेट केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 16, 2024 | 09:05 AM
संभाजीराजे छत्रपतींचे आंदोलन यशस्वी; विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात केलेल्या आंदोलनाचे सकारात्मक पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत  आहेत. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने गडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात केली असून आतापर्यंत या कारवाईत ५० अतिक्रमणे हटवण्यात आल्याची माहिती, प्रशासनाने दिली आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन सुरू केले होते. पण दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आणि याठिकाणी दोन गटात तुफान दगडफेक, जाळपोळ झाली. अनेकांची घरेही यात जळून खाक झाली. पण या घटनेत मुस्लीम समाजाला  टार्गेट केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. संभाजीराजेंविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला.  पण हे सर्व आरोप फेटाळून लावत संभाजीराजे यांनी प्रशासनावरच टीका केली.

सोमवारी (15 जुलै) पत्रकार परिषद घेत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याला सुरुवात झाली आहे. यात फक्त मुस्लीम समजाचीच  नव्हे, तर हिंदू लोकांनी केलेली अतिक्रमणेही काढली आहेत. यात पहिले अतिक्रमण दोन हिंदू कुटुंबांचे काढले, असे सांगत आरोप करणाऱ्यांवर पलटवार केला. सोमवारी (15 जुलै) जिल्हा प्रशासनाने 50 अतिक्रमणे हटवली. मंगळवारीही (16 जुलै)  हे अतिक्रमणे हटवण्याचे काम सुरू राहील. या कामावेळी गडावर जिल्हा पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाचे 400 हून अधिक  कर्मचारी आणि शासकीय अधिकारी यांच्यामार्फत अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू आहे.  यात महसूल विभागाचे 90 कर्मचारी, , दीडशे पेक्षा अधिक मजूर, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि ग्रामसेवक उपस्थित होते. दरम्यान, संभाजीराजेंच्या या आंदोलनाला यश आल्याची प्रतिक्रीया सर्वत्र उमटत आहे.

दुसरीकडे, विशाळगडावरील 158 पैकी दोन अतिक्रमण धारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर जिल्हा प्रशासनाने यांसदर्भात प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांबाबत शासकीय महाभियोक्ता आणि मुंबई उच्च न्यायालय यांचे अभिप्राय  मागवले होते. ते अभिप्राय आल्यानंतर 15 जुलै 2024 रोजी गडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.

Web Title: After sambhaji raje chhatrapatis movement the encroachment on vishalgarh started to be removed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 09:05 AM

Topics:  

  • political news
  • Sambhajiraje Chhatrapati

संबंधित बातम्या

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने
1

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

पंढरपुरात नगराध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत; भालके, शिरसट, साबळेंमध्ये रंगणार सामना
2

पंढरपुरात नगराध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत; भालके, शिरसट, साबळेंमध्ये रंगणार सामना

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप
3

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही
4

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.