मुंबई : देशाचे राष्ट्रीय सुरक्ष सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अनेक मंत्र्याच्या भेटी घेत आहेत. आज सकाळीच त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyri) यांची राजभवन येथे भेट घेतली होती. आता त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली.
[read_also content=”आता माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी करणार ‘ही’ नोकरी! https://www.navarashtra.com/sports/now-former-cricketer-vinod-kambli-will-do-this-job-321987.html”]
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अनेक मोठे नेते एकमेकांची भेट घेताना दिसत आहे. आणि या भेटीच्या संपुर्ण राज्यात चर्चा होताना दिसत आहे. आज सकाळीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असून या दोघांमध्ये काही वेळ विविध विषयांवर चर्चा झाल्याचं समजतयं मात्र, नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती मिळालेली नाही.
पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोवल यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/duIgXTQWyK
— Governor of Maharashtra (@maha_governor) September 3, 2022
आता अजित डोवाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र भेट घेतली आहे. तसेच त्यानंतर अजित डोवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जणार असल्याची माहिती समोर येत आहे.
[read_also content=”ठाण्यात कृत्रिम तलावामध्ये बुडून सात वर्षीय बालकाचा मृत्यू https://www.navarashtra.com/crime/a-seven-year-old-boy-died-after-drowning-in-an-artificial-lake-in-thane-nrgm-321946.html”]