Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी कामगारांचे आंदोलन; सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी एल्गार!

राज्यातील एसटी कामगार संघटनेकडून आंदोलनाचे अस्त्र उगारण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर आजपासून दोन दिवशीय आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 09, 2024 | 08:18 PM
एसटी कामगारांचे आंदोलन; सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी एल्गार!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवारपासून (ता.९) मुंबई येथील आझाद मैदानावर असंख्य एसटी कामगारांच्या उपस्थितीत दोन दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आज आंदोलनस्थळी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी, मागण्या याबाबात माहिती दिली आहे.

काय आहेत प्रमुख मागण्या?

एस टी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगारवाढ देण्यात यावी. मागील पाच वर्षांपासून शिल्लक असलेला वेतनवाढीचा फरक, घरभाडे भत्तावाढीचा फरक, महागाई भत्तावाढीचा फरक एकरकमी देण्यात यावा. तसेच जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धतीत बदल करावा, सेवेत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय घेण्यात यावा, सेवेत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना मोफत वैद्यकीय उपचारासाठी कैशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, याकरीता निर्णय घेण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून उभारण्यात आले आहे.

…तर राज्यभर आंदोलन उभारणार

दरम्यान, आमदार कैलास पाटील, आमदार रविंद्र धंगेकर, आमदार विजय पाटील आदींनी आज आंदोलनास्थळी जात एस टी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यात येईल, असे आश्वासन तिन्ही आमदारांनी दिले आहे. या आंदोलनात संयुक्त कृती समितीत सहभागी असलेल्या संघटनांचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, राज्य सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास ९ ॲागष्ट क्रांतीदिनापासून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

त्यानंतर कास्ट्राईब रा.प.कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवणे, एस टी वर्कर्स युनियन (इंटक) अध्यक्ष कैलास कदम, सरचिटणीस मुकेश तिगोटे, एस टी कामगार सेनेचे चिटणीस सुभाष जाधव, एस टी कामगार काँग्रेसचे अध्यक्ष दादाराव डोंगरे, बहुजन रा प कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग वाघमारे, परिवहन मजदुर संघटनेचे सरचिटणीस विनोद गजभिये, रा प मागासवर्गीय अधिकारी, पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव कसबे, कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेचे विधी सल्लागार उदय मालाधारी, कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे आदींनी आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांना संबोधित केले.

Web Title: Agitation of st workers for salary hike and other demands like government employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 08:18 PM

Topics:  

  • Central Government Employees
  • Salary Hike
  • ST Workers

संबंधित बातम्या

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मोदी सरकारने CGHS शी संबंधित नियम बदलले, जाणून घ्या
1

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मोदी सरकारने CGHS शी संबंधित नियम बदलले, जाणून घ्या

Pune News: “मागण्या मान्य होईपर्यत…”; भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांचा इशारा
2

Pune News: “मागण्या मान्य होईपर्यत…”; भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांचा इशारा

तंत्रज्ञान क्षेत्रातही महिलांची भरारी; डेटा, डिझाईनसारख्या क्षेत्रात मिळतंय १.६ कोटींपर्यंत पॅकेज
3

तंत्रज्ञान क्षेत्रातही महिलांची भरारी; डेटा, डिझाईनसारख्या क्षेत्रात मिळतंय १.६ कोटींपर्यंत पॅकेज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यात ‘इतक्या’ टक्क्यांची केली वाढ
4

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यात ‘इतक्या’ टक्क्यांची केली वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.