Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: वणव्याचे थैमान! जांभळदरा परिसरात ९ शेतकऱ्यांच्या बागा खाक; ठिबकसह शेती साहित्याचे मोठे नुकसान

अहिल्यानगर तालुक्याच्या जांभळदरा परिसरात १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वणवा पेटून मोठी आग लागली. या आगीत ९ शेतकऱ्यांच्या बागा खाक झाल्या आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 16, 2026 | 09:08 PM
Ahilyanagar News: वणव्याचे थैमान! जांभळदरा परिसरात ९ शेतकऱ्यांच्या बागा खाक; ठिबकसह शेती साहित्याचे मोठे नुकसान
Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार अकोळनेर शिवेलगत असलेल्या जांभळदरा परिसरात १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वणवा पेटून मोठी आग लागली. या आगीत परिसरातील ९ शेतकऱ्यांच्या शेतातील फळझाडे व इतर प्रकारची झाडे होरपळून निघाली, तर या शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबकचे पाईप, शेततळ्याचे कागद, विहिरी, बोअरवेलच्या पाईपलाईनही जळाल्या असून या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी ३ च्या सुमारास लमाणबाबा देवस्थान पासून काही अंतरावर असलेल्या डोंगरावर अचानक वणवा पेटला.

दुपारी वेळ आणि कडक उन त्यामुळे आगीने काही काळातच रौद्र रूप धारण केले. डोंगरावरून ही आग जवळच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पसरली. परिसरातील नागरिकांना आगीच्या ज्वाला व धुराचे लोट दिसू लागल्यावर नागरिकांनी तिकडे धाव घेतली. मात्र आग विझवण्यासाठी कुठलीही साधने उपलब्ध नसल्याने आणि आगीने रौद्र रूप धारण केलेले असल्याने नागरिकांना काहीच करता आले नाही.

Ahilyanagar News: आमदार खताळांची तलाठी कार्यालयावर ‘धडक’ कारवाई; एका मेसेजवर उघड केला ‘एजंटगिरी’चा कारभार!

आग लागली की लावली गेली? चौकशीची मागणी

आग कशामुळे लागली, की कोणी लावली याची प्रशासनाने सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यानी केली आहे. कोणी सिगारेट ओढून तेथे टाकून दिली असावी किवा मुद्दामहून आग लावली असावी अशीही शंका शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे. प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी, तातडीने पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

नुकसान झालेल्या झाडांची भरपाई मिळावी

दुपारी वेळ आणि कडक उन त्यामुळे आगीने काही काळातच रौद्र रूप धारण केले. डोंगरावरून ही आग जवळच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पसरली. परिसरातील नागरिकांना आगीच्या ज्वाला व धुराचे लोट दिसू लागल्यावर नागरिकांनी तिकडे धाव घेतली. या आगीत परिसरातील ९ शेतकऱ्यांच्या शेतातील फळझाडे व इतर प्रकारची झाडे होरपळून निघाली, तर या शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक चे पाईप, शेततळ्याचे कागद, विहिरी, बोअरवेलच्या पाईपलाईनही जळाल्या असून या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

चंदन, कडुनिंब आणि मलबारालब झाड आगीच्या भक्षस्थानी

या आगीत सुधाकर रंगनाथ धामणे यांच्या शेतातील चंदन, कडूनिंब, मलबारलिंब आदी झाडे, विशाल मधुकर धामणे, सुभाष भास्कर धामणे, विलास गंगाधर धामणे, वनाजी गंगाधर धामणे या शेतकऱ्यांच्या शेतातील चिंचेची झाडे, संजय आप्पासाहेब धामणे यांच्या शेतातील संत्र्याची बाग, ज्ञानदेव भाऊसाहेब धामणे व पोपट भाऊसाहेब धामणे यांच्या शेतातील आंब्याची बाग, राजेंद्र आप्पासाहेब धामणे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले आहे. या शिवाय या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात ठिबक सिंचनाचे अंथरलेले पाईप, विहिरी, बोअरवेलच्या पाईपलाईन, शेततळ्यातील कागद व पाईपलाईन आदी शेती साहित्य जळन मोठे नकसान झाले आहे.

 

Web Title: Ahilyanagar jambhaldara forest fire 9 farmers orchards destroyed drip irrigation loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

PhonePe यूजर्स, सावधान! तुम्ही तुमचं वॉलेट वापरले नाही तर तुमच्या बँकअकाउंटमधून पैसे होणार कट?
1

PhonePe यूजर्स, सावधान! तुम्ही तुमचं वॉलेट वापरले नाही तर तुमच्या बँकअकाउंटमधून पैसे होणार कट?

पुढचा नंबर कोणाचा? SEBI नंतर राजेश एक्सपोर्ट्सवर ED ची धाड, बंगळुरुत अनेक ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी
2

पुढचा नंबर कोणाचा? SEBI नंतर राजेश एक्सपोर्ट्सवर ED ची धाड, बंगळुरुत अनेक ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी

आता बजेटमध्ये होणार विमान प्रवास! हवाई इंधनाचे दर घसरल्याने Flight Ticket होणार स्वस्त; एअरलाईन्सचा मोठा निर्णय
3

आता बजेटमध्ये होणार विमान प्रवास! हवाई इंधनाचे दर घसरल्याने Flight Ticket होणार स्वस्त; एअरलाईन्सचा मोठा निर्णय

अरे देवा…Tata Electronic वर सायबर अटॅक! Apple-Tesla चे ट्रेड सीक्रेट्स केले हॅक…
4

अरे देवा…Tata Electronic वर सायबर अटॅक! Apple-Tesla चे ट्रेड सीक्रेट्स केले हॅक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.