Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: दुर्दैवी! वीज पडून शेतकऱ्यासह 9 गायींचा मृत्यू; अवकाळीचा मोठा फटका

अहिल्यानगर जिल्ह्यात आज अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. राहता तालुक्याला देखील या अवकाळीचा फटका पडला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 01, 2026 | 08:27 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळीचा फटका
  • राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे जीवितहानी
  • वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात अवकाळी पाऊस आणि सोसाट्‌याच्या वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले. ही नैसर्गिक आपत्ती दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण घटनांना कारणीभूत ठरली. एकीकडे शेतकऱ्याचा जीव घेतला, तर दुसरीकडे नऊ गायींचा बळी घेत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले. या दुहेरी दुर्घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे. तसेच आणखी काही दिवस अवकाळीचा अंदाज असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kia Seltos चे 2 नवीन मॉडेल्स लवकरच लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या अपेक्षित किंमत

लोणी खुर्द येथील मापरवाडी भागात राहणारे शेतकरी सोमनाथ जिजाबापू गाडगे यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी उशीरा घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गाडगे यांनी गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात कांद्याची लागवड केली होती. दिवसभर त्यांच्या शेतात महिला मजुरांकडून कांदा काढणीचे काम सुरू होते.

सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले. त्या पाठोपाठ जोरदार पावसाला आणि वादळाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी महिला मजूर प्लास्टिकच्या आडोशाला थांबल्या होत्या. मात्र, काही अंतरावर उभ्या असलेल्या सोमनाथ गाडगे यांच्यावर अचानक वीज कोसळून त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा आवाज इतका प्रचंड होता की परिसर दणाणून गेला. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याच दिवशी रात्री उशीरा पाथरे बुद्रुक येथे आणखी एक भीषण घटना घडली. अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेची तार तुटून थेट गायींच्या गोठ्यावर कोसळली. या दुर्घटनेत तब्बल नऊ गार्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना संजय भास्कर घोलप आणि सोपान लक्ष्मण घोलप यांच्या गोठ्यात घडली.

“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha यांचे विधान

मोठा आवाज आणि आगीचे लोळ अंगावर

लोणी येथे शेतात उभे असलेले गाडगे यांच्या अंगावर विजेच्या तडाख्यामुळे आगीचे लोळ पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या महिला मजुरांचा थरकाप उडाला. या घटनेमुळे लोणी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमनाथ गाडगे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली आणि आई असा परिवार आहे.

पिकांच्या नुकसानीसोबत जिवीत हानी देखील

लोणी येथे वीज पडून एकाचा मृत्यू, त्या पाठोपाठ रात्री पाथरे येथे नऊ गायींचा अंत, या दोन्ही घटना अवकाळी पावसामुळे घडलेल्या आहेत. एकीकडे या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असतानाच दुसरीकडे जिवीत हानी होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरण व महसूल प्रशासनाचे अधिकारी पाथरे येथे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आहे.

शेतकरी घोलप यांचे लाखोंचे झाले नुकसान

अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी गायींच्या गोठ्याकडे धाव घेतली. मदत मिळेपर्यंत गायींचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत शेतकरी संजय घोलप यांचे अंदाजे नऊ लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Web Title: Ahilyanagar lightning farmer death 9 cows unseasonal rain impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.