फोटो सौजन्य: Pinterest
Kia चा हा निर्णय Seltos साठी योग्य वेळेत घेतलेला मानला जात आहे. एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, २०२६ हे वर्ष या SUV साठी खास ठरले असून आतापर्यंत ६ लाखांहून अधिक गाड्यांची विक्री झाली आहे. तसेच, या कारला ५-स्टार सेफ्टी रेटिंगही मिळाली आहे. त्यामुळे नवीन व्हेरिएंट्सच्या मदतीने Seltos अधिक लोकप्रिय करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
Tata Motors ची ऐतिहासिक कामगिरी, ‘इतक्या’ लाख वाहनांच्या विक्रीसह आर्थिक वर्ष 26 मध्ये नवा विक्रम!
सध्याच्या टॉप मॉडेल्सप्रमाणे GTX(O) आणि X-Line(O) व्हेरिएंट्सही प्रीमियम आणि आकर्षक डिझाइनसह येण्याची शक्यता आहे. GT-Line व्हर्जनमध्ये दमदार बंपर, अलॉय व्हील्स आणि हिरव्या रंगाचे ब्रेक कॅलिपर्स मिळू शकतात. तर X-Line व्हेरिएंटमध्ये खास मॅट पेंट आणि काळ्या रंगातील डिझाइन एलिमेंट्स कायम राहण्याची अपेक्षा आहे.
या नवीन व्हेरिएंट्समध्ये फीचर्सकडे विशेष लक्ष दिले जाऊ शकते. Kia पुन्हा एकदा हेड-अप डिस्प्ले फीचर देऊ शकते, जे जुन्या Seltos मध्ये होते पण नवीन मॉडेलमध्ये नव्हते. याशिवाय डॅशकॅम, एअर प्युरिफायर आणि मेमरी फंक्शनसारखे फीचर्सही देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हे मॉडेल्स अधिक प्रीमियम ठरू शकतात.
NDTV च्या माहितीनुसार, या मॉडेल्समध्ये सुरक्षिततेवर विशेष भर दिला जाईल. ६ एअरबॅग्स, ESC, चारही चाकांवर डिस्क ब्रेक आणि ३६०-डिग्री कॅमेरासारखे फीचर्स कायम ठेवले जातील. यासोबतच लेव्हल-२ ADAS तंत्रज्ञानही देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हे मॉडेल्स अधिक सुरक्षित आणि प्रगत बनतील.
Maruti Dzire vs Honda Amaze: कोणती Sedan Car कमी पैश्यात देते सुसाट मायलेज? जाणून घ्या
या दोन्ही नवीन व्हेरिएंट्समध्ये दोन इंजिन पर्याय मिळू शकतात. एक १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन ७-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह आणि दुसरे १.५-लिटर डिझेल इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्ससह येऊ शकते. Kia हे GTX(O) आणि X-Line(O) व्हेरिएंट्स मे किंवा जून २०२६ दरम्यान लॉन्च करू शकते, ज्यांची किंमत अंदाजे १९ ते २२ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.






