
राहुरीत 85 वाहनांवर धडक कारवाई! 44 हजारांचा दंड वसूल करत पोलिसांची मोहीम यशस्वी
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अनेक दुचाकी गाड्या चोरांकडून स्वस्तात खरेदी करून विना नंबर प्लेट वापरल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ४ डिसेंबर रोजी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. राहुरी शहरात २८ दुचाकी विना नंबर प्लेट आढळून आल्याने १५००० दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर वांबोरी दूर क्षेत्रात ५७ विना नंबर प्लेट वाहनांवर २८००० दंड करण्यात आला. दोन्ही मिळून एकूण ८५ वाहनांवर कारवाई करत ४४००० रुपये दंड वसूल करण्यात आला. तपासणीदरम्यान जप्त केलेल्या वाहनांवर तत्काळ नंबर प्लेट बसवून त्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या.
Ahilyanagar News: शिक्षकांचा ‘टीईटी’ सक्तीला जोरदार विरोध! शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा
ही मोहीम पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी देवदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पार पडली. नवीन गाड्यांवर नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रस्त्यावर सोडल्याने संबंधित शोरूम चालकांवर आरटीओमार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
दुचाकी गाड्या चोरांकडून स्वस्तात खरेदी करून विना नंबर प्लेट वापरल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. राहुरी शहरात २८ दुचाकी विना नबर प्लेट आढळून आल्याने १५००० दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर वांबोरी दूर क्षेत्रात ५७ विना नंबर प्लेट वाहनांवर २८००० दंड करण्यात आला. दोन्ही मिळून एकूण ८५ वाहनांवर कारवाई करत ४४००० रुपये दंड वसूल करण्यात आला.
मुंबई विमान सेवा १५ डिसेंबरपर्यंत बंद, अमरावती-मुंबईत दाट धुक्याचा परिणाम; प्रवासी झालेत हैराण
आपल्या सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट अनिवार्यपणे बसवाव्यात, जेणेकरून विनाकारण दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार नाही आणि चोरीच्या घटनांमध्ये वाहन शोधणे सोपे जाईल, तसेच अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवले जात असल्यास त्यांच्या पालकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.