शिक्षकांचा 'टीईटी' सक्तीला जोरदार विरोध! शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा
मुंबई विमान सेवा १५ डिसेंबरपर्यंत बंद, अमरावती-मुंबईत दाट धुक्याचा परिणाम; प्रवासी झालेत हैराण
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी अनिवार्यतेवरील निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात शासनाकडून होत असलेला विलंब चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
शिक्षण विभागाने टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढून सुरू केलेल्या कारवाया तात्काळ थांबवाव्यात, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, तसेच शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 10-20-30 वर्षांनंतरची सुधारित वेतन-प्रगती योजना त्वरित लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, 15 मार्च 2024 चा संच मान्यतेसंबंधी शासन निर्णय रद्द करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद असलेली भरती सुरू करणे आणि सर्व रिक्त पदे 100% भरणे यावरही संघटनेने जोर दिला.
मोर्चादरम्यान शिक्षकांनी पुढील महत्वाच्या मागण्या मांडल्या:
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेवेत असलेल्या शिक्षकांना पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याची सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये संभ्रम आणि संतापाची लाट पसरली आहे.
शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्राशी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.
शिक्षकांनी स्पष्ट केले की, अशैक्षणिक कामांच्या वाढत्या बोजामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
राज्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटना प्रथमच एकत्रितपणे रस्त्यावर उतरल्याने या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.






