Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“दिवाळी गोड तुमची की शेतकऱ्यांची?” संगमनेर शेतकरी मेळाव्यात सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

अहिल्यानगर येथील संगमनेर शेतकरी मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्या नेमक्या काय म्हणाल्या त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 28, 2025 | 07:14 PM
"दिवाळी गोड तुमची की शेतकऱ्यांची?" संगमनेर शेतकरी मेळाव्यात सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

"दिवाळी गोड तुमची की शेतकऱ्यांची?" संगमनेर शेतकरी मेळाव्यात सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

Follow Us
Close
Follow Us:

संगमनेर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “सरकार म्हणते दिवाळी गोड करू, पण गोड कोणाची झाली? तुमची की शेतकऱ्यांची?” असा थेट सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष वेधले.

खा. सुळे म्हणाल्या, “शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे तब्बल ८० हजार कोटी रुपये आहेत, पण शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी दहा-वीस हजार कोटी रुपये नाहीत. आता तर सरकार म्हणते, आम्ही कर्जमाफीबद्दल कधीच बोललो नव्हतो. सध्याच्या सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसा नाही, काही महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे उरणार नाहीत.”

Highway Road Condition: राष्ट्रीय महामार्ग 65 च्या खाली साचले पाण्याचे तळे; प्रवास धोक्याचा झाल्याने वाढले अपघाताचे प्रमाण

त्या सावरगाव घुले (ता. संगमनेर) येथे माजी पोलिस पाटील लाडूजी घुले यांच्या अभिष्टचिंतन व शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या. या वेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात, गणपत महाले, संदीप वर्षे, सुहास वाळुंज, जालिंदर गागरे, गौरव डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मालाला बाजारभाव नाही, शेतकऱ्यांच्या घरात अंधार

खा. सुळे म्हणाल्या, “कांदा, झेंडू, केळी यांना आज बाजारभाव नाही. शेतकऱ्यांच्या घरात अंधार आहे, तर सरकारच्या घरात मिठाईचे बॉक्स पोहोचले आहेत. सरकार एसीत बसते, गाडीतून फिरते आणि आम्ही शेतकरी आत्महत्या करत आहोत. आमची तिरडी गेल्यावर मग कर्जमाफी करणार का?”

त्या पुढे म्हणाल्या, “जनजीवन मिशन योजनेची अवस्था बिकट आहे. किती टाक्या बांधल्या आणि किती पूर्ण झाल्या याचा पत्ता नाही. काही ठेकेदारांची बिले निघाली, काहींची नाही. हे सरकार केवळ दिखावा करत आहे. शेतकरी, शिक्षक, ठेकेदार आत्महत्या करत असताना सरकार मात्र उत्सव साजरे करत आहे. जनतेचे दुःख पाहण्याची तयारी सरकारकडे नाही.”

राज्यातील पर्यटकांना हत्तीबेटाचा भरळ; One Day Trip साठी जाणून घ्या कुठे आहे अन् कसे जाल?

खा. सुळे यांनी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गौरव करत म्हटले, “येथील शेतकरी आजही पांढरी टोपी, पायजमा आणि कडक टोपी घालतो. हे या भूमीचे अभिमान आहे. आमच्याविरोधात सत्ताधारी, यंत्रणा आणि नेते होते, तरी जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला.”

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही – बाळासाहेब थोरात

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “सह्याद्रीच्या रगातील पठार भाग नेहमीच पाण्याअभावी संकटात असतो. येथील लोक मेहनती आणि प्रामाणिक आहेत. लाडूजी घुले यांनी गावासाठी उत्कृष्ट काम केले आहे. आज शेतकरी बिकट परिस्थितीत आहे. मविआ सरकारने पहिल्याच बैठकीत कर्जमाफी केली होती, पण सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे नाही.” थोरात पुढे म्हणाले, “शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावावर राजकारण करून जातीवाद्यांना साथ देणे चुकीचे आहे.”

Web Title: Ahilyanagar news supriya sule troll state government in sangamner farmers meet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 07:14 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • supriya sule

संबंधित बातम्या

द्राक्षहंगामात शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आमदार रोहित पाटील सरसावले
1

द्राक्षहंगामात शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आमदार रोहित पाटील सरसावले

पुण्यातील जैन बोर्डिंगप्रकरणी स्टे कायम! अहिल्यानगरमधील जैन समाज झाला आक्रमक
2

पुण्यातील जैन बोर्डिंगप्रकरणी स्टे कायम! अहिल्यानगरमधील जैन समाज झाला आक्रमक

Gangaram Gawankar Death:’वस्त्रहरण’ चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन, मराठी रंगभूमीवर शोककळा!
3

Gangaram Gawankar Death:’वस्त्रहरण’ चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन, मराठी रंगभूमीवर शोककळा!

‘आमचा ट्रेलर बघू नका!’, ‘गोंधळ’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अनोखे आवाहन, कारण सांगत म्हणाले…
4

‘आमचा ट्रेलर बघू नका!’, ‘गोंधळ’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अनोखे आवाहन, कारण सांगत म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.