Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: अतिक्रमणाचा प्रश्न चिघळला! जामखेडमध्ये बेमुदत बंदचा इशारा

जामखेडच्या राष्ट्रीय महामार्गावरून रोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. याच महामार्गावरील अतिक्रमणांच्या प्रश्नावरून राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि जामखेड नगरपरिषदेत पत्रयुद्ध सुरु झाले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 06, 2026 | 07:55 PM
अतिक्रमणाचा प्रश्न चिघळला! जामखेडमध्ये बेमुदत बंदचा इशारा

अतिक्रमणाचा प्रश्न चिघळला! जामखेडमध्ये बेमुदत बंदचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि जामखेड नगरपरिषदेत पत्रयुद्ध सुरु
  • जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार
  • अतिक्रमणांच्या प्रश्नावरून जामखेडमध्ये बेमुदत बंदचा इशारा
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांच्या प्रश्नावरून राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि जामखेड नगरपरिषदेत सुरू असलेले पत्रयुद्ध, त्यातून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार यामुळे हा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रत्यक्ष कारवाई होईपर्यंत उद्यापासून जामखेड शहर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, नगरपरिषदेच्या नोटिसा मिळाल्यानंतर काही अतिक्रमणधारक न्यायालयात गेल्याने प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालय (पाथर्डी) यांनी २ मार्चला जामखेड पोलिस निरीक्षकांना पत्र पाठवून अतिक्रमण कारवाईसाठी पोलिस बंदोबस्ताचा खर्च कोणी करायचा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट सूचना नाहीत.

Badlapur News : कोणी घर देतं का घर ? लोन काढून पैसे दिले पण… ; नामांकित इमारतीतील रहिवासी बेघर

जामखेड नगरपरिषद हद्दीत अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची आहे. त्यासाठी यंत्रसामग्री राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारांकडून उपलब्ध करून देण्याचे आदेश दिल्याचे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, जामखेडमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याच्या मागणीसाठी अवधूत पवार यांच्या नेतृत्वाखाली २४ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू आहे.

आंदोलकांनी ५ मार्चपर्यंत अतिक्रमण हटविण्याची मुदत प्रशासनाला दिली होती. मुदतीत कारवाई न झाल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. ‘हद्द निश्चिती’ करून प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होईपर्यंत जामखेड शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

महामार्गने केले हात वर…

महामार्ग उपविभागीय अभियंत्यांनी जामखेड नगरपरिषदेला पाठविलेल्या पत्रात महामार्गाच्या ‘राईट ऑफ वे’मध्ये (ROW) अतिक्रमण आढळले नाहीत. महामार्ग हद्दीबाहेरील अतिक्रमणे हटविण्याचे अधिकार या कार्यालयाला नसल्याने अशा कारवाईत सहभाग घेता येणार नसल्याचे सांगतानाच सार्वजनिक रस्त्यांची नियमित रेषा निश्चित करणे, बांधकाम परवानगी देणे व रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असल्याचे पत्रात म्हटले आहे.

त्यांनी हे सांगितलेच नव्हते…

या संदर्भात प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जामखेडमधील अतिक्रमणाच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सात-आठ संयुक्त बैठका झाल्या. बैठकीत कधीही महामार्ग विभागाने आपल्या हद्दीत अतिक्रमण नसल्याचे सांगितले नव्हते. जर अतिक्रमण नाही, तर गेली चार वर्षे रस्त्याचे काम पूर्ण का झाले नाही? या प्रकरणात जिल्हा प्रशासनाचे मार्गदर्शन घेत निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले.

नगरपरिषदेचे पत्राद्वारे प्रतिउत्तर

जामखेड नगरपरिषदेने महामार्ग विभागाला पत्राद्वारे प्रतिउत्तर दिले आहे. एखादा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्यानंतर महामार्गाच्या जमिनीचे संरक्षण करणे, त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची तसेच मोजणी अहवालाच्या आधारे अतिक्रमण निश्चितीची जबाबदारी महामार्गची आहे. जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले असताना दिशाभूल करणारा पत्रव्यवहार थांबवावा, अन्यथा न्यायालयीन अडचणी निर्माण झाल्यास त्याची वैयक्तिक जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर राहील, असा इशाराही नगरपरिषदेने दिला आहे.

Web Title: Ahilyanagar news warning of protest against jamkhed encroachment issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Karjat Jamkhed

संबंधित बातम्या

Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!
1

Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!

अहिल्यानगरसाठी ऐतिहासिक क्षण! ‘सिव्हिल’मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू; प्रवेश प्रक्रिया कधीपासून? जाणून घ्या
2

अहिल्यानगरसाठी ऐतिहासिक क्षण! ‘सिव्हिल’मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू; प्रवेश प्रक्रिया कधीपासून? जाणून घ्या

Ahilyanagar :धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक; कारवाई करण्याची केली मागणी
3

Ahilyanagar :धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक; कारवाई करण्याची केली मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा! ‘या’ पोहोचतंय टँकरद्वारे पाणी
4

Ahilyanagar News: अहिल्यानगर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा! ‘या’ पोहोचतंय टँकरद्वारे पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.