Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News : शेवगावमधील खाकी वर्दीतील संवेदनशील चेहरा; पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी स्मशानभूमीत साजरी केली अनोखी दिवाळी

Ahilyanagar News : दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा, या भावनेतून शेवगावचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी एक अनोखा उपक्रम राबवला. पत्नी आणि पोलीस सहकाऱ्यांसह त्यांनी स्मशानभूमीत राहणाऱ्या अनिल गायकवाड यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.

  • By विवेक
Updated On: Nov 08, 2026 | 09:41 PM
ahilyanagar smashanbhmi diwali

ahilyanagar smashanbhmi diwali

Follow Us
Follow Us:
  • पोलीस निरीक्षक मोहन बोरसेंची अनोखी दिवाळी
  • समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या कुटुंबाला दिला आधार
  • खाकी वर्दीतील माणुसकीचं सर्वत्र कौतुक
 

पोपट पिटेकर, शेवगाव,अहिल्यानगर : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचा सण आणि कटुता विसरून एकमेकांच्या आयुष्यात उजेड पसरवण्याचा सण…ही केवळ एक आणि दोन ओळींची व्याख्या नाही, तर तिचा प्रत्यय शेवगाव शहरात खऱ्या अर्थाने आला आहे. नेहमीच आपल्या धडक कारवाई आणि हटके सामाजिक उपक्रमांमुळे चर्चेत असणारे शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील आणि माणुसकीने भरलेल्या कृतीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. (Ahilyanagar News)

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात अनेक कौतुकास्पद घटना घडत असतात, परंतु पोलीस दलातील एका जबाबदार अधिकाऱ्याने आपल्या पत्नीसह आणि सहकाऱ्यांसोबत थेट स्मशानभूमीत राहणाऱ्या उपेक्षित कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची कदाचित महाराष्ट्रातील ही पहिलीच आणि अत्यंत प्रेरणादायी घटना असावी.

अंधारात जगणाऱ्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश-

गेल्या अनेक वर्षांपासून शेवगावच्या स्मशानभूमीत राहून तिथली राखण करण्याचे आणि मृत्युनंतर अंत्यसंस्काराची विविध कामे पार पाडण्याचे कष्टाचे काम अनिल गायकवाड यांचे कुटुंब करत आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या, कायम स्मशानभूमीच्या निवाऱ्यात आणि उपेक्षेच्या अंधारात दिवस काढणाऱ्या या कुटुंबाची दिवाळी इतर सर्वसामान्य नागरिकांसारखी आनंदाची कधीच नसते.

जिथे अंत्यविधीनंतर कोणी थांबत नाही, तिथेच गायकवाड कुटुंबाची साजरी होते दिवाळी!

हीच गोष्ट पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या संवेदनशील मनाला स्पर्श करून गेली. सण-उत्सवाच्या काळात प्रत्येकाच्या घरात रोषणाई आणि आनंदाचे वातावरण असताना, स्मशानभूमीत राहणाऱ्या गायकवाड कुटुंबाची दिवाळी साधी आणि अंधारातच जाण्याची शक्यता होती. हे ओळखून बोरसे यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त स्मशानभूमीतच जाऊन या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याचे ठरवले.

कपडे, फराळ अन् मायेची उब!

केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवत पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी आपल्या पत्नीसह आणि पोलीस सहकाऱ्यांसोबत गायकवाड कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी गायकवाड कुटुंबातील सर्व लहान-थोर सदस्यांना नवीन कपडे भेट दिले.दिवाळीचा पारंपरिक फराळ, गोडधोड पदार्थ आणि खाऊ दिला. कुटुंबाच्या गरजेनुसार इतर आवश्यक दैनंदिन साहित्य सुपूर्द केले.

या साहित्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे, पोलीस अधिकाऱ्याने आपल्या कुटुंबासह येऊन आपल्यासोबत वेळ घालवला, संवाद साधला आणि आपल्या अडचणी जाणून घेतल्या, यामुळे गायकवाड कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले.

‘खाकी’तील संवेदनशील मनाचे सर्वत्र कौतुक-

सामान्यत: समाजात पोलिसांची प्रतिमा ही कडक शिस्त, गुन्हेगारांवर वचक आणि कायदा-सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करणारी म्हणून पाहिली जाते. परंतु, त्या खाकी वर्दीमागे एक संवेदनशील, मायाळू आणि समाजमनाचा वेध घेणारे मन लपलेले असते, हे मोहन बोरसे यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.

‘नवराष्ट्र‘ वृत्तपत्राने या आगळ्यावेगळ्या घटनेला वाचा फोडल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रातून या उपक्रमाचे जोरदार स्वागत होत आहे. शेवगाव शहर आणि परिसरातील विविध सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक आणि सामान्य जनतेने पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल तीव्र शब्दांत गौरवोद्गार काढले आहेत.

“पोलीस हा केवळ कायदा सुव्यवस्था राखणारा रक्षकच नाही, तर समाजातील शेवटच्या घटकाच्या दुःखात पाठीशी उभा राहणारा एक खरा मित्रही असतो, अशा भावना शेवगावकरांकडून व्यक्त होत आहेत.

मोहन बोरसे आणि त्यांच्या पत्नीसह पोलीस प्रशासनाने घेतलेला हा संवेदनशील निर्णय केवळ शेवगावपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण राज्यातील पोलीस दल आणि समाजप्रमुखांसाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी पायंडा ठरला आहे.

आरेतील आदिवासींसोबत मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी; फराळ वाटप करत घेतला, तारपा नृत्याचा आनंद

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेवगावमध्ये स्मशानभूमीत दिवाळी कोणी साजरी केली?

    Ans: शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी पत्नी आणि पोलीस सहकाऱ्यांसोबत स्मशानभूमीत राहणाऱ्या अनिल गायकवाड यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.

  • Que: मोहन बोरसे यांनी गायकवाड कुटुंबाला काय भेट दिली?

    Ans: त्यांनी कुटुंबातील सदस्यांना नवीन कपडे, दिवाळीचा फराळ, मिठाई, खाऊ आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट दिल्या.

  • Que: मोहन बोरसेंच्या उपक्रमाचं कौतुक का होत आहे?

    Ans: समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करून त्यांनी सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकीचा संदेश दिला. त्यामुळे त्यांच्या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Web Title: Ahilyanagar news shevgaon police inspector mohan borse celebretes diwali in smashanbhumi vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Diwali 2026
  • diwali news

संबंधित बातम्या

Mumbai News : शिवाजी पार्कमध्ये दिवाळी पहाट रंगली! 10 हजारांहून अधिक रसिकांची उपस्थिती; दुष्काळग्रस्तांसाठी 2.15 कोटींची मदत
1

Mumbai News : शिवाजी पार्कमध्ये दिवाळी पहाट रंगली! 10 हजारांहून अधिक रसिकांची उपस्थिती; दुष्काळग्रस्तांसाठी 2.15 कोटींची मदत

Diwali : जिथे अंत्यविधीनंतर कोणी थांबत नाही, तिथेच गायकवाड कुटुंबाची साजरी होते दिवाळी!
2

Diwali : जिथे अंत्यविधीनंतर कोणी थांबत नाही, तिथेच गायकवाड कुटुंबाची साजरी होते दिवाळी!

Diwali : रुग्णालयाच्या आवारातही फुलवला दिवाळीचा आनंद; 400 जणांना फराळ, 75 महिलांना साड्या
3

Diwali : रुग्णालयाच्या आवारातही फुलवला दिवाळीचा आनंद; 400 जणांना फराळ, 75 महिलांना साड्या

Vijay Sales Diwali 2026 : विजय सेल्सचा दिवाळी धमाका ! स्मार्टफोन, टीव्ही आणि होम अप्लायन्सेसवर ऑफर्स; बँककार्डवर २० हजारांची सूट
4

Vijay Sales Diwali 2026 : विजय सेल्सचा दिवाळी धमाका ! स्मार्टफोन, टीव्ही आणि होम अप्लायन्सेसवर ऑफर्स; बँककार्डवर २० हजारांची सूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.