Swami Samarth world record : अहिल्यानगरच्या स्वामी समर्थ केंद्राचा जागतिक विक्रम! एकाच वेळी २७ हजार भाविकांचे सामूहिक पारायण

अहिल्यानगरच्या बोल्हेगाव परिसरातील संत तुकाराम नगर येथील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राने एकाच वेळी २७ हजार सामूहिक स्वामी चरित्र पारायण करून जागतिक विक्रम नोंदविला आहे. केंद्राच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त आयोजित या उपक्रमाची विनर्स बुक ऑफ इंडिया या संस्थेने जागतिक विक्रम म्हणून नोंद
Swami Samarth world record फोटो सौजन्य सोशल मिडिया
Swami Samarth world record फोटो सौजन्य सोशल मिडिया Swami Samarth world record फोटो सौजन्य सोशल मिडिया
Published on: 
Updated on: 
  • स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचा संकल्प

  • जागतिक विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र केंद्राच्या पटांगणात पार

  • जागतिक विक्रम करणारे बोल्हेगाव फाटा

पोपट पिटेकर , अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील बोल्हेगाव परिसरातील संत तुकाराम नगरमधील स्वामी समर्थ केंद्रात (दिंडोरी प्रणित) एकाच वेळी २७ हजार सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचा जागतिक विक्रम नोंदविण्यात आला असून, त्याबाबतचे प्रमाणपत्र केंद्राला नुकतेच प्रदान करण्यात आले.

स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचा संकल्प

केंद्राचे प्रमुख समन्वयक चंद्रशेखर लोळगे काका यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली २५ वर्षांपूर्वी या केंद्राची स्थापना करण्यात आली. केंद्राच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या पार्श्वभूमीवर गेल्या २६ जुलै २०२६ रोजी केंद्राच्या परिसरात २५ हजार सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचा संकल्प चंद्रशेखर लोळगे काका यांनी सोडला होता.

या अभिनव उपक्रमाला अहिल्यानगर शहर व जिल्ह्यासह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव या शेजारील जिल्ह्यातील स्वामी समर्थ महाराजांचे भक्त व सेवेकरी यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. परिणामी २५ हजारांऐवजी तब्बल २७ हजार भाविकांनी सामूहिक स्वामी चरित्र पठण केले.

Swami Samarth world record फोटो सौजन्य सोशल मिडिया
जमीन मोजणीचा नकाशा मिळण्यासाठी आता महिनोंमहिन्यांची प्रतीक्षा संपणार? भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय

जागतिक विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र केंद्राच्या पटांगणात पार

विनर्स बुक ऑफ इंडिया या संस्थेने या उपक्रमाची जागतिक विक्रम म्हणून नोंद केली आहे. 'विनर्स'चे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते या उपक्रमाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर लोळगे काका यांना जागतिक विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र केंद्राच्या पटांगणात पार पडलेल्या एका भव्य विशेष समारंभात प्रदान करण्यात आले. लोळगे काका व डॅा. हारके यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

जागतिक विक्रम करणारे बोल्हेगाव फाटा

केंद्रातील हरिदास कुमटकर, देवीदास जाधव, अभिजीत नरसाळे, संदीप दुधाडे, किरण भुसे, बाळासाहेब पोकळे, महेश गोसावी, महेश नारखेडे, सतीश अनाप, जालिंदर आरगडे, दीपक लांडे, यशवंत उंडे, सुभाष घोरपडे, आप्पासाहेब गांगुर्डे, लहू लोणकर, नानासाहेब खरात, बाबासाहेब गवांदे, सुरेश आदमाने यांच्यासह केंद्रातील सेवेकरी बंधू-भगिनींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. अशा प्रकारचा जागतिक विक्रम करणारे बोल्हेगाव फाटा येथील स्वामी समर्थ केंद्र हे राज्यातील पहिलेच केंद्र ठरले असल्याचे भाविकांनी यावेळी स्पष्ट केले.

Swami Samarth world record फोटो सौजन्य सोशल मिडिया
Pune News: साहित्याच्या मांदियाळीत अध्यक्षाच्या खुर्चीचा हव्यास? 'मसाप'मध्ये प्रथमच पोलिस बंदोबस्त; विषय काय?