कर्जत-जामखेड: विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. यापलीकडेही राम शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्यातील संघर्षही संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. पण अलीकडच्या काळात राम शिंदे आणि रोहित पवारांमधील संघर्ष अगदीच टोकाला पोहचला आहे. त्यामुळे राम शिंदे यांनी आता थेट शरद पवार यांनाच आव्हान देण्यास सुरूवात केली आहेत.
विधानसभा निवडणुकांनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. आजी-माजी आमदार, खासदार, कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. अशातच काल (3 मे) रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नारायण आबा पाटील यांनी चौंडी येथे राम शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्येही तब्बल अर्धा तास बंद दाराआड झाली. सध्या तरी या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत कोणीतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र चर्चेची वेळ पाहता , राम शिंदे नगरच्या राजकारणात मोठा भूकंप घडवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. या घडामोडींचा पहिला धक्का शरद पवार यांना बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१७व्या मजल्यावरून उडी मारून ३५ वर्षीय महिलेची आत्महत्या; घटना सीसीटीव्हीत कैद
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरमधील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीतही चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळवत कारखान्यावर एकहाती सत्ता स्थापन केली. पण विशेष आमदार रोहित पवार यांनीच आपल्याच पक्षाचे आमदार नारायण पाटील यांच्या पॅनल विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप केला. नारायण पाटील यांच्या आरोपांमुळे अशा परिस्थितीतही नारायण पाटील यांच्या पॅनलने विरोधकांचा जोरदार पराभव करत निर्णायक विजय मिळवला. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता, राज्याच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरली.
शनिवारी सायंकाळी चौंडी येथे नारायण आबा पाटील आपल्या पॅनलमधील नवनिर्वाचित संचालकांसह दाखल झाले. याठिकाणी त्यांनी राम शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. ही बैठक केवळ साखर कारखान्याच्या निवडणुकीपुरती मर्यादित नसून, तिचा संबंध राज्याच्या राजकीय समीकरणांशी असावा, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या चर्चेत नेमकी कोणती मुद्दे उपस्थित झाले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, राजकीय वर्तुळात या भेटीचे विविध अर्थ काढले जाऊ लागले आहेत.
तीन मुलींसह विवाहितेची राहत्या घरी आत्महत्या; पती घरी आला, दार उघडलं अन् धक्काच बसला