Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध

कारखान्याच्या सर्व मतदारसंघात निवडून द्यायच्या प्रतिनिधी संख्येइतकेच उमेदवार त्या-त्या मतदारसंघात शिल्लक राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 08, 2022 | 08:51 PM
अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रातील नावाजलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध झाली. कारखान्याच्या सर्व मतदारसंघात निवडून द्यायच्या प्रतिनिधी संख्येइतकेच उमेदवार त्या-त्या मतदारसंघात शिल्लक राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिला.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्यादित शाहुनगर-शेंद्रे, सातारा या कारखान्याची २०२२-२०२३ ते २०२७-२०२८ या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरु होती. महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ च्या नियम ३२ मधील तरतुदीनुसार सत्ताधारी पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ऊस उत्पादक सभासद गट क्र. १ सातारामधून शिवेंद्रसिंहराजे भोसले, अभयसिंहराजे, सावंत नामदेव विष्णू, घोरपडे राजेंद्र भिकू हे बिनविरोध निवडून आले.

व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक २ नागठाणेमधून साळुंखे मोहनराव नथुराम,निकम एकनाथ उर्फ सुनिल दत्तात्रय, साळुंखे यशवंत हरी यांची बिनविरोध निवड झाली. व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक ३ अतितमधून काळभोर शिवाजी रघुनाथ, जगदाळे रामचंद्र रंगराव, जाधव बजरंग श्रीरंग, व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक – ४ चिंचणेररमधून शेडगे विश्वास रामचंद्र, घोरपडे भास्कर एकनाथ, घोरपडे विजयकुमार आनंदराव, व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक – ५ गोवेमधून सावंत सर्जेराव दिनकरराव, साबळे पांडुरंग आप्पाजी, पाटील नितीन भानुदास हे बिनविरोध झाले.

सातारा उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थामधून साळुंखे शशिकांत यशवंत, महिला राखीव मतदारसंघातून फडतरे विजया सत्पाल आणि शेलार वनिता अशोक, इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून कुंभार जयवंत रामचंद्र, वि.जा.भ.ज./विमाप्र राखीव मतदार संघातून कुराडे अशोक रामचंद्र, अनुसूचित जाती/जमाती राखीव मतदारसंघातून पवार वसंत जगन्नाथ हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

Web Title: Ajinkyatara factory election unopposed for fourth time in a row nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2022 | 08:51 PM

Topics:  

  • Shivendra Raje Bhosale

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.