Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यसभा उमेदवारासाठी अजित पवार गटाकडून ‘या’ नावासाठी जोर; बंडखोरीचाही इशारा

अद्याप अजित पवार गटाने राज्यसभेच्या उमेदवाराची नावे समोर आणलेली नाहीत. राज्यसभेसाठी एका उमेदवारासाठी कार्यकर्ते आग्रही असून न दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा देखील दिला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 14, 2024 | 03:37 PM
राज्यसभा उमेदवारासाठी अजित पवार गटाकडून ‘या’ नावासाठी जोर; बंडखोरीचाही इशारा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यसभेचा (Rajya Sabha 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी आपले उमेद्वार जाहीर केले आहेत. महायुतीमधून आत्तापर्यंत चार राज्यसभेचे उमेदवार (Rajya Sabha candidate) जाहीर करण्यात आले आहेत. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा (Milind Deora) यांना तिकीट देण्यात असून भाजपकडून (BJP) अशोक चव्हाण (Ashok Chavan), मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) व डॉ. अजित गोपछडे (Dr. Ajit Gopchade) यांना संधी देण्यात आली आहे. मात्र अद्याप अजित पवार गटाने (Ajit Pawar group) राज्यसभेच्या उमेदवाराची नावे समोर आणलेली नाहीत. राज्यसभेसाठी एका उमेदवारासाठी कार्यकर्ते आग्रही असून न दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा देखील दिला आहे.

महायुतीमधील अजित पवार गटाने अजून आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षातून केली जात आहे. पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेद्वारीसाठी आग्रह धरला आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेवर उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील, असा थेट इशारा देणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केले आहे. अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ दादा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्या अन्यथा हजारो युवक बाहेर पडतील असा थेट इशारा पक्षश्रेष्ठींना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी दिला@AjitPawarSpeaks @SunilTatkare @praful_patel @parthajitpawar pic.twitter.com/PGaz6z4S23 — Ncp Ravindra Nana Patil (@NcpRavindraNana) February 14, 2024

अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी पार्थ पवार यांच्यासाठी खास ट्वीट केले असून अजित पवार यांना इशारा दिला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्या, अन्यथा हजारो तरुण कार्यकर्ते बाहेर पडतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र नाना पाटील यांचा इशारा…” असे ट्वीट करत रवींद्र पाटील यांनी इशारा दिला आहे. अजित पवार या मागणीचा किती विचार करतात आणि राज्यसभेसाठी मुलगा पार्थ पवार यांना संधी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ajit pawar group demands name of partha pawar for rajya sabha candidate also warning of rebellion nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • Ashok Chavan
  • Medha Kulkarni

संबंधित बातम्या

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर
1

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेरण्यासाठी काँग्रेसची नवी खेळी; ‘या’ पक्षाशी करणार हातमिळवणी?
2

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेरण्यासाठी काँग्रेसची नवी खेळी; ‘या’ पक्षाशी करणार हातमिळवणी?

पुण्याला बुडती नौका म्हणणं सत्ताधारी खासदारांना शोभतंय का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल
3

पुण्याला बुडती नौका म्हणणं सत्ताधारी खासदारांना शोभतंय का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल

खासदार मेधा कुलकर्णींचा भाजपला घरचा आहेर! विविध प्रकल्पाच्या दिरंगाईवर व्यक्त केली नाराजी
4

खासदार मेधा कुलकर्णींचा भाजपला घरचा आहेर! विविध प्रकल्पाच्या दिरंगाईवर व्यक्त केली नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.