
सावंतवाडी येथे ‘अजित पवार’ गटात माजली खळबळ
वारंग यांच्या अनुपस्थितीबद्दल काही माहीत नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक रंगतदार होणार
सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नगराध्यक्ष पदासाठी जाहीर झालेल्या उमेदवार उल्का वारंग आणि त्यांचे पती, विधानसभा प्रमुख उमाकांत वारंग, यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळी प्रक्रियेकडे पाठ फिरवली. यामुळे गटात मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. सिंधुदुर्गमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवारच ‘नॉट रिचेबल’ झाल्याने राष्ट्रवादीला केवळ पाच जणांचे एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज भरून समाधान मानावे लागले. महायुती होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नसतानाही, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख उदय भोसले यांनी स्वबळावर लढण्याचा आणि निवडून येण्याचा दावा केला आहे. आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून अगस्तीन फर्नांडिस, उदय भोसले, दिशा कामत, रंजना निर्मल, आणि सत्यवान चेंदवणकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
आम्ही फक्त लढण्यासाठी उभे आहोत
आम्ही फक्त लढण्यासाठी उभे राहिलो आहोत. महायुतीची स्थिती स्पष्ट नसली तरी, आम्ही स्वबळावर लढू. आम्ही पाच जण पन्नास जणांना भारी आहोत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेला सामोरे जाणार असून, जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भोसले यांनी व्यक्त केला.
वारंग यांच्या अनुपस्थितीबद्दल काही माहीत नाही
अद्यापपर्यंत आपल्याला काही समजले नाही. त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आले होते, परंतु त्यांचा संपर्क झाला नाही. त्यांचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ होता. त्यामुळे नेमके काय झाले, हे आपण त्यांच्याशी भेटून चर्चा करू. नंतरच आपल्याला ते कळेल, तोपर्यंत आपण तूर्तास काहीच बोलू शकत नाही, असे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उल्का वारंग यांच्या अनुपस्थितीबद्दल तालुकाप्रमुख उदय भोसले यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
श्यावेळी शहराध्यक्ष सत्यजित धारणकर, ऑगस्तीन फर्नांडिस, रिद्धी परब, रोहन परब दिशा गुरुदत्त कामत, रवळोजीराव उर्फ उदय कृष्णराव भोसले, रंजना रामचंद्र निर्मल, ऑगोस्टीन पास्कु फर्नाडिस, सत्यवाण कृष्णा चेदंवणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली?
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक राजकीय कलाटणी देणाऱ्या घटना घडल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी अशी मुख्यत्वे निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. परंतु आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी बंडखोरांनी अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे राजकीय भूकंप घडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
Ans: सिंधुदुर्गमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवारच 'नॉट रिचेबल' झाल्याने खळबळ उडाली आहे.
Ans: उदय भोसले यांनी स्वबळावर लढण्याचा आणि निवडून येण्याचा दावा केला.
Ans: