Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jagadguru Shri Sant Tukaram Maharaj: अजित पवारांनी देहूत घेतले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन

यंदाचा ३४० वा पालखी सोहळा आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने पालखी प्रस्थानाची  तयारी पूर्ण झाली आहे. चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला असून रथाला आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 18, 2025 | 02:03 PM
Jagadguru Shri Sant Tukaram Maharaj: अजित पवारांनी देहूत घेतले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन
Follow Us
Close
Follow Us:

पुणे, शहर प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात बुधवारी दर्शन घेतले. यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते. दर्शनानंतर संस्थानच्यावतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला.

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

“केंद्रात मोदींची सत्ता तरी गुजरातमध्ये हिंदी सक्तीची…, राज्य सरकार भाषा का लादत आहे?” राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखीचे आज (१८ जून) देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.  पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी पालखी सोहळ्याबाबत माहिती दिली आहे. यंदाचा ३४० वा पालखी सोहळा आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने पालखी प्रस्थानाची  तयारी पूर्ण झाली आहे. चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला असून रथाला आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत.

इनामदार वाड्यात पालखी पहिला मुक्काम असेल. कोरोना महारामारीचे पालखी सोहळ्यावरही पडसाद उमटले होते. पण कोरोनाची साथ ओसरल्यानंतर मागील वर्षापासून पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीने वारी सुरू करण्यात आली.

Beed Crime: मुलीच्या लग्नाचं स्वप्न अपूरचं राहिलं…! बापाने मल्टिस्टेट बँकेच्या गेटवर आयुष्य संपवलं

दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गांसंबधी माहिती दिली होती. येत्या वर्षभरात पालखी मार्गाचे काम पूर्ण केले जाईल.  पुण्यातील देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गांची हवाई पाहणी केली.  तसेच, पालखी मार्गावरील दुपदरी रस्त्यांचे चौपदरीकरण केले जात आहे. वारकऱ्यांचे पाय भाजू नयेत, याची काळजी घेतली जात आहे. या पालखी मार्गांवर  ज्ञानेश्वरीत उल्लेख करण्यात आलेले वृक्ष लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही गडकरी यांनी नमुद केलं होतं.

Web Title: Ajit pawar paid homage to jagadguru shri sant tukaram maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 01:14 PM

Topics:  

  • Ashadhi Wari Solhla

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.