"केंद्रात मोदींची सत्ता तरी गुजरातमध्ये हिंदी सक्तीची..., राज्य सरकार भाषा का लादत आहे?" राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल (फोटो सौजन्य-X)
Raj Thackeray News Marathi: राज्यात हिंदी ही तिसरी भाषा शिकवण्याच्या शैक्षणिक धोरणाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला होता. याचदरम्यान राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घे थेट सरकारला इशारा दिला आहे. यावेळी, राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रातील शैक्षणिक धोरण हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मी यावर तुम्हाला सविस्तर सांगेन. महाराष्ट्र सरकारने पहिल्या नव्या शैक्षणिक धोरणात पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेतलाय. मी दोन पत्रं आतापर्यंत दिली आहेत. आतापर्यंत दोन्ही पत्राचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली.या दोन पत्रातून सुरुवातीला करण्यात आलेला विरोध आणि सरकारने हिंदी सक्ती करू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. महाराष्ट्र आपल्या भाषेची अस्मिता कधी जपणार असा प्रश्न विचारला होता. यानंतर राज ठाकरे यांनी तिसरं पत्र राज्यातल्या मुख्याध्यापकांना लिहिलं असल्याचं सांगितलं. हे पत्र राज ठाकरे यांनी वाचून दाखवलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (18 जून) तातडीची पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरणावर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले आज मी शैक्षणिक धोरणाशिवाय कशावरही बोलणार नाही. मी जे बोलणार आहे ते सविस्तर बोलणार आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये असा निर्णय घेतला आहे की पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा. मी पहिलं पत्र काढलं होतं एक उजळणी म्हणून पुन्हा एकदा ते पत्र वाचून दाखवतो, असं म्हणत त्यांनी आपलं जुन पत्र वाचून दाखवलं. यावेळी त्यांनी आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, असं म्हणत जुनं पत्र वाचून दाखवलं आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र,
एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरु आहे. आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि… pic.twitter.com/6UokP2N0QA
— Raj Thackeray (@RajThackeray) June 18, 2025
“गुजरात काऊन्सिल एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, गांधीनगर ही एक गुजराती वेबसाइट आहे, सुरुवातीपासून त्यांनी तीन भाषा जपल्या आहेत – गुजराती, गणित, इंग्रजी. गुजरातमध्ये जर हिंदी सक्तीची नाही, मग महाराष्ट्रात का लादता? एक भाषा विकसित करण्यासाठी अनेक पिढ्या लागतात, प्रत्येक भाषा चांगली असते. गुजराती, मराठी, तमिळ या चांगल्या भाषा आहेत. हिंदी ही देखील एक अतिशय सुंदर भाषा आहे. ती राज्यभाषा आहे, राष्ट्रीय भाषा नाही. पण तिसरी भाषा हिंदी तुम्ही आमच्यावर का लादताय? असा गंभीर प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.“आतापर्यंत शैक्षणिक धोरणात सहावीपासून ऑप्शनल धोरण होतं. कॉलेजमध्ये असताना विद्यार्थ्याला पाहिजे ती भाषा निवडू दे. हवी ती भाषा घेऊन तो पुढे जाईल. तुम्ही का लादता? पत्रकार म्हणून तुम्ही हा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे” असं राज ठाकरे म्हणाले.