Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! जप्त केलेला तब्बल 900 किलो खवा गायब; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

वाहतूक पोलिसांना अकोला लक्झरी स्टँडवर अहमदाबादहून आलेल्या एका खासगी लक्झरी बसमध्ये मोठ्या प्रमाणात खवा आढळून आला. हा खवा संशयास्पद वाटल्याने त्यांनी तत्काळ सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 07, 2026 | 02:27 PM
धक्कादायक ! जप्त केलेला तब्बल 900 किलो खवा गायब; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

धक्कादायक ! जप्त केलेला तब्बल 900 किलो खवा गायब; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • अहमदाबादहून अकोल्यात खासगी बसने आणला संशयित खवा
  • लक्झरी स्टँडवर सुमारे ९०० किलो ते एक टन खवा आढळला
  • वाहतूक पोलिसांनी दिली सिटी कोतवाली पोलिसांना माहिती
अकोला : अहमदाबाद येथून एका खाजगी बसने अकोला लक्झरी स्टँडवर आणलेला सुमारे 900 किलो ते एक टन संशयित खवा सिटी कोतवाली पोलिसांनी रविवारी जप्त केला होता. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) माहिती देण्यात आली. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात खव्याची पाहणी केली. मात्र, कोणतीही अधिकृत हस्तांतरण प्रक्रिया न करताच हा खवा रातोरात गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

वाहतूक पोलिसांना अकोला लक्झरी स्टँडवर अहमदाबादहून आलेल्या एका खासगी लक्झरी बसमध्ये मोठ्या प्रमाणात खवा आढळून आला. हा खवा संशयास्पद वाटल्याने त्यांनी तत्काळ सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता खव्याबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर हा खवा कोतवाली पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला. काही वेळाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

पाहणीदरम्यान खवा संशयास्पद असून, त्याचे नमुने घेऊन तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, सुट्टीचा दिवस असल्याने तसेच सहाय्यक आयुक्त दे. गो. वीर अकोल्यात उपस्थित नसल्याने पुढील प्रक्रिया करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडून खव्याचे अधिकृत हस्तांतरण करण्यात आले नसल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मूळ मालकाचा पत्ताच नाही

सिटी कोतवाली पोलिसांनी एफडीएला दिलेल्या पत्रात जप्त केलेला खवा मूळ मालकाचा शोध घेऊन अटी व शर्तीवर परत केल्याचे नमूद केले आहे. मात्र, संबंधित मालकाचे नाव, पत्ता किंवा संपर्क क्रमांक यांचा उल्लेख पत्रात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा खवा नेमका कोणाला आणि कोणत्या आधारावर परत करण्यात आला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

खव्याचे नमुने तपासणीसाठी न घेता परत

खव्याचे नमुने तपासणीसाठी न घेता तो परत केल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे अधिकारी खवा पोलिस ठाण्यातच ठेवून परतले. मात्र, दुसऱ्याच दिवशी सिटी कोतवाली पोलिसांनी संबंधित खवा मूळ मालकाचा शोध घेऊन अटी व शर्तीवर परत केल्याचे पत्र एफडीए कार्यालयाला दिले. त्यामुळे खव्याची तपासणी होण्यापूर्वीच तो परत कसा करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खव्याबाबत कोणतीच कल्पना नाही

सिटी कोतवाली पोलिसांकडून जप्त केलेल्या खव्याबाबत माहिती देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून खवा हस्तांतरीत करण्यात आला नाही. सोमवारी कोतवाली पोलिसांकडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, जप्त केलेला खवा मूळ मालकाला शोधून अटी व शर्तीवर परत करण्यात आला. परंतु, त्या पत्रात मूळ मालकाचे नाव, पत्ता व त्यासंबंधी इतर कुठलीही माहिती नाही. आजरोजी खवा कुठे आहे याबाबत आमच्या कार्यालयाला कुठलीच कल्पना नाही.

– दे. गो. वीर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अकोला.

FAQ

1. अकोला पोलिसांनी किती खवा जप्त केला होता?
अहमदाबादहून आलेल्या खासगी बसमधून सुमारे ९०० किलो ते एक टन संशयित खवा जप्त करण्यात आला होता.

2. खवा कुठून आणण्यात आला होता?
खवा अहमदाबाद येथून खासगी लक्झरी बसने अकोला लक्झरी स्टँडवर आणण्यात आला होता.

3. खवा कोणी जप्त केला?
वाहतूक पोलिसांच्या माहितीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खवा जप्त केला.

Web Title: Massive 900 kg of confiscated khoya has gone missing nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • akola news
  • FDA Action

संबंधित बातम्या

धावत्या बसमध्ये चालकालाच आला हृदयविकाराचा झटका; वाहकाने समयसूचकता दाखवली अन् 25 प्रवाशांचे वाचले प्राण
1

धावत्या बसमध्ये चालकालाच आला हृदयविकाराचा झटका; वाहकाने समयसूचकता दाखवली अन् 25 प्रवाशांचे वाचले प्राण

मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न; 13 कोटींतून विकास; तरीही प्रवाशांची गैरसोय
2

मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न; 13 कोटींतून विकास; तरीही प्रवाशांची गैरसोय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.