Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावत्या बसमध्ये चालकालाच आला हृदयविकाराचा झटका; वाहकाने समयसूचकता दाखवली अन् 25 प्रवाशांचे वाचले प्राण

चालकाची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच वाहक प्यारेलाल चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता चालकाला बसमधील मागील आसनावर बसवले. यावेळी प्रवाशांनीही मदत केली. त्यानंतर चव्हाण यांनी स्वतः बसचे स्टेअरिंग हाती घेतले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 07, 2026 | 12:57 PM
धावत्या बसमध्ये चालकालाच आला हृदयविकाराचा झटका; वाहकाने समयसूचकता दाखवली अन् 25 प्रवाशांचे वाचले प्राण

धावत्या बसमध्ये चालकालाच आला हृदयविकाराचा झटका; वाहकाने समयसूचकता दाखवली अन् 25 प्रवाशांचे वाचले प्राण

Follow Us
Follow Us:
  • धावत्या एसटी बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा त्रास.
  • चालक राजेंद्र लासूरकर यांची अचानक प्रकृती खालावली.
  • बसमध्ये २५ प्रवासी होते.
  • चालकाने वाहकाला छातीत दुखत असल्याचे सांगितले.
अकोला : राज्य परिवहन महामंडळाची बस चालवत असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यामुळे बसमधील २५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, बसमधील वाहकाने प्रसंगावधान राखत चालकाला बसमधील मागील आसनावर बसवले आणि स्वतः बसचे स्टेअरिंग हाती घेतले. त्यानंतर बस थेट शासकीय सर्वोपचार रुग्णालयात नेऊन चालकाला दाखल केले.

वाहकाने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे चालकासह बसमधील 25 प्रवाशांचे प्राण वाचले. सध्या चालकाची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर सुरू आहेत. नागपूर आगाराची (एमएच ०६/बीडब्ल्यू ०९०३) बस शुक्रवारी नागपूरहून धुळ्याकडे २५ प्रवाशांना घेऊन रवाना झाली होती. ही बस दुपारी अकोल्यात पोहोचल्यानंतर चालक बदलण्यात आला. त्यानंतर राजेंद्र लासूरकर यांनी पुढील प्रवासाची जबाबदारी स्वीकारली. बस बाळापूर तालुक्यातील व्याळा गावाजवळ पोहोचण्यापूर्वीच चालकाला छातीत दुखू लागले. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांनी वाहकाला याबाबत माहिती दिली.

चालकाची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच वाहक प्यारेलाल चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता चालकाला बसमधील मागील आसनावर बसवले. यावेळी प्रवाशांनीही मदत केली. त्यानंतर चव्हाण यांनी स्वतः बसचे स्टेअरिंग हाती घेतले आणि प्रवाशांच्या मदतीने बस थेट शासकीय सर्वोपचार रुग्णालयात नेली. तेथे चालकाला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि २५ प्रवाशांचे प्राण वाचले.

चालकाकडून आरोप

चालक राजेंद्र लासूरकर यांचा गुरुवारी अपघात झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक नव्हती. याच कारणास्तव त्यांनी आगारप्रमुखांकडे सुटीसाठी अर्ज अर्ज केला होता. मात्र, त्यांची सुटी नाकारून त्यांना कर्तव्यावर पाठविण्यात आल्याचा आरोप चालकाने केला आहे. प्रकृती ठीक नसतानाही आगारप्रमुखांनी त्यांना ड्युटीवर पाठविल्याने २५ प्रवाशांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप चालकासह काही प्रवाशांनी केला आहे.

FAQ

१. बस चालकाला काय झाले?
नागपूरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस चालवत असताना चालक राजेंद्र लासूरकर यांना अचानक छातीत दुखू लागले आणि हृदयविकाराचा त्रास सुरू झाला.

२. बसमध्ये किती प्रवासी होते?
बस मध्ये एकूण २५ प्रवासी होते.

३. चालकाची प्रकृती बिघडल्यानंतर काय झाले?
चालकाने वाहकाला प्रकृती बिघडल्याची माहिती दिली. त्यानंतर वाहकाने प्रसंगावधान राखून चालकाला बसमधील मागील आसनावर बसवले.

Web Title: Bus driver suffers a heart attack while bus is running nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • akola news
  • MSRTC Bus
  • st bus news

संबंधित बातम्या

मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न; 13 कोटींतून विकास; तरीही प्रवाशांची गैरसोय
1

मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न; 13 कोटींतून विकास; तरीही प्रवाशांची गैरसोय

Akola News : विजेचा शून्य वापर, तरीही 850 रुपयांचे आले बिल; बिलाच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह
2

Akola News : विजेचा शून्य वापर, तरीही 850 रुपयांचे आले बिल; बिलाच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.