Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात प्रकल्प, कार्यालय वाशिममध्ये; शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका

नदीजोड प्रकल्पामुळे जिल्ह्याला २८२.३४ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी साठवण्यासाठी धरणे बांधणे गरजेचे आहे. तूर्तास काटेपूर्णा प्रकल्पाएवढा प्रकल्प बांधण्यासाठी जिल्ह्यात जागा नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 21, 2026 | 02:59 PM
अकोल्यात प्रकल्प, कार्यालय वाशिममध्ये; शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका

अकोल्यात प्रकल्प, कार्यालय वाशिममध्ये; शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांना जिल्ह्याचे ठिकाण अगदी जवळ
  • भूसंपादनासह शेतकऱ्यांना विविध कामांसाठी
  • वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) या डिव्हिजनला जोडली
अकोला : महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पात बार्शिटाकळी आणि पातूर तालुक्यात दोन धरणे प्रस्तावित आहेत. या अनुषंगाने जागा मोजणीचे काम सुरू आहे. परंतु, या दोन्ही धरणांचे कार्यालय मात्र वाशिम जिल्ह्यात ठेवण्यात आले आहेत. हे दोन्ही तालुके अकोला जिल्ह्यात येतात. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्याचे ठिकाण अगदी जवळ आहे. मात्र, असे असताना पाटबंधारे विभागाने दोन्ही तालुक्यातील धरणांचे कार्यालय मात्र वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) या डिव्हिजनला जोडली आहेत.

या प्रकारामुळे या दोन्ही तालुक्यातील या शेतकऱ्यांना भूसंपादनातील अडचणींसाठी वेळ, पैसा व श्रम खर्च करावे लागणार आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका तयार झालेली आहे. नदीजोड प्रकल्पामुळे जिल्ह्याला २८२.३४ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी साठवण्यासाठी धरणे बांधणे गरजेचे आहे. तूर्तास काटेपूर्णा प्रकल्पा एवढा प्रकल्प बांधण्यासाठी जिल्ह्यात जागा नाही. मात्र, काटेपूर्णा प्रकल्पापेक्षा कमी साठवण असलेले प्रकल्प बांधणे शक्य आहे. त्यामुळेच जिल्ह्यात चार धरणे बांधणे प्रस्तावित आहेत.

दरम्यान, यात सिसा उदेगाव, लोअर काटेपूर्णा, येळवण आणि चिखलगाव या धरणांचा समावेश आहे. या धरणांच्या माध्यमातून २०७ दलघमी पाणी साठवता येणार आहे. तर उर्वरित पाणी तीन लघु प्रकल्पांची साठवण क्षमता वाढवून पाणी साठवले जाणार आहे.

पिण्याचे पाणी तसेच सिंचनाचे मोठे प्रश्न

वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलढाणा आदी जिल्ह्यांना वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे तीन लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. पिण्याचे पाणी तसेच सिंचनाचे मोठे प्रश्न यातून सुटणार आहेत. या नदीजोड प्रकल्पाच्या कालव्याद्वारे सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे. या अनुषंगाने वैनगंगा ते नळगंगापर्यंतचे ४२६ किमीच्या कॅनॉलचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या नदीजोड प्रकल्पात वाशीम जिल्ह्याचा तसेच पैनगंगा प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे.

Maharashtra Farmers : पाच हजारांच्या मदतीला कागदपत्रांचे ग्रहण ! शेतकऱ्यांचा सरकारकडे मोठा आग्रह

Web Title: Project in akola office in washim nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 02:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.