
कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा समतोल बिघडला! (Photo Credit- X)
उद्दिष्ट आणि प्रत्यक्षातील आकडेवारी
सलग तीन वर्षांत पुरुष नसबंदीचे (Vasectomy) उद्दिष्ट आणि प्रत्यक्षात केलेल्या शस्त्रक्रिया यातील तफावत चिंताजनक आहे:
| वर्ष | उद्दिष्ट (Target) | प्रत्यक्षात सहभाग (Actual) |
| २०२३ | ६७४ | केवळ १०० पुरुष |
| २०२४ | ६८० | केवळ १०१ पुरुष |
| २०२५ | ६८० | केवळ ७६ पुरुष |
म्हणजेच, पुरुष नसबंदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेला सलग तीन वर्षे अपयश आले आहे.
पुरुष सहभाग कमी होण्याची कारणे
पुरुष नसबंदी ही केवळ १० मिनिटांची सुरक्षित प्रक्रिया असून, यासाठी ₹१४५० चे प्रोत्साहन अनुदान देखील दिले जाते. असे असतानाही पुरुषांचा सहभाग इतका कमी का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामागे पुरुषांमध्ये असलेली भीती, नसबंदीबद्दलचे गैरसमज आणि सामाजिक दबाव असू शकतो. याउलट, महिलांनी मात्र तिन्ही वर्षांत शस्त्रक्रिया, पीपीआययुसीडी (PPIUCD), तांबी (IUD), गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन आणि छाया कार्याक्रमाच्या माध्यमातून कुटुंब नियोजनाचा मोठा भार उचलला आहे. पुरुषांचा सहभाग जवळपास शून्य दिसून येत आहे.
जनजागृतीचे आव्हान
जिल्हा आरोग्य यंत्रणेवरच आता गैरसमज दूर करणे, समुपदेशन, जनजागृती आणि फॉलो अप घेणे ही जबाबदारी आहे, परंतु या अंमलबजावणीकडे गेल्या तीन वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे.
डॉ. बळीराम गाढवे, डीएओ (DAO) यांनी यासंदर्भात माहिती दिली:
“नसबंदीबाबत जनजागृती वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध उपक्रम सुरू असून मार्च २०२६ पर्यंत यात पुरुषांचा सहभाग वाढेल, अशी अपेक्षा आहे. याबाबतीत असलेले काही गैरसमज दूर करणे हे आव्हान आहे.”