Akola Election News: 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघ्या 4 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे उमेदवार दिवसरात्र एक करून प्रचार करण्यावर अधिक भर देत आहेत.
पातूर तालुक्यातील उमरा येथील स्व. रामरावजी गावंडे विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अकोल्यातील मोहाळा गावात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर नमाजनंतर चाकू हल्ला झाला. गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असून राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अकोल्यातील असदुद्दीन ओवैसी यांच्या रॅलीत गोंधळ झाला. वाद वाढत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली, जाणून घ्या नक्की काय घडले
अकोल्यातील मोठी उमरी परिसरात समलिंगी नात्यातील संशय व वादातून 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाली. लिव्ह-इन पार्टनरने मारहाण केल्याचे तपासात उघड झाले असून आरोपी ताब्यात आहे.
अकोला–खामगाव महामार्गावर तरुणीचा पाठलाग करून अश्लील शब्दांत बोलत हातवारे केल्याचा आरोप पोलिस उपनिरीक्षकावर झाला आहे. डायल 112 मुळे तरुणीची सुटका झाली असून आरोपी PSI ला अटक करण्यात आली आहे.
अकोल्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून संतोष घावडे यांची लोखंडी पाईपने हत्या करण्यात आली. आरोपी राम गिरामला पोलिसांनी अटक केली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे.
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
महापालिका निवडणूकीसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
मिशन परिवर्तनअंतर्गत जिल्ह्यात अमलीपदार्थविरोधी मोहिम अधिक तीव्र करत स्थानिक गुन्हे शाखेने साखरखेर्डा पोलिस ठाणे हद्दीतील मलकापूर पांग्रा शिवारात मोठी कारवाई केली.
अकोला जिल्ह्यातील ‘विज्ञानवेध’ उपक्रमांतर्गत निवडलेल्या ३१ गुणवंत विद्यार्थ्यांसाठी इस्रो, बेंगलोरसह दक्षिण भारतातील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देणारा विशेष शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात आला आहे.
Akola 108 Ambulance Record: अकोला जिल्ह्यात १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेने २५ ऑक्टोबरपर्यंत तब्बल १.९७ लाखांहून अधिक नागरिकांचे प्राण वाचवण्याचा विक्रमी टप्पा गाठला आहे.
Road Accident News: जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या १० महिन्यांत ३७३ अपघातांमध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ११८ प्राणघातक अपघातांचा समावेश आहे. गत तीन वर्षांत ६५३ जणांचा बळी गेला…
अकोला शहरातून १५ वर्षांचे तीन मित्र रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले असून कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत. रात्री घरी न परतल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोतवाली पोलिस सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास…
नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीनसाठी असलेल्या कठीण अटींमुळे बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. तपासणीत सोयाबीन बसत नसल्याने शेतकऱ्यांवर शेतमाल परत नेण्याची वेळ आली आहे.
Akola Crime: अकोला पोलिसांनी 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत अवैध दारू विक्री विरोधात मोठी मोहीम यशस्वी केली. मागील ६ महिन्यांत हजाराहून अधिक कारवाया करत लाखोंचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.