Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola: अवकाळी पावसाचा दणका! उगवलेला हरभरा वाया, बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे मोठे संकट! उगवलेल्या हरभरा पिकाचे नुकसान झाल्याने दुबार पेरणीची वेळ. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 01, 2025 | 04:13 PM
अवकाळी पावसाचा दणका! उगवलेला हरभरा वाया (Photo Credit - X)

अवकाळी पावसाचा दणका! उगवलेला हरभरा वाया (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • हरभरा गेला वाया!
  • ऐनवेळी आलेल्या पावसाने शेतपिकांचे नुकसान
  • शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण
अकोला: यंदा खरिपातील पिकांचे (विशेषतः सोयाबीनचे) उत्पादन घटल्याने मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची पेरणी केली होती. पेरणीनंतर बियाणे उगवले, मात्र मागच्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवेळी पावसामुळे शेतीत पाणी साचले आणि उगवलेल्या हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणीची वेळ आली असून, आर्थिक संकट वाढले आहे.

शेतकरी महिलेला मोठा फटका

बाळापूर तालुक्यातील अंदुरा भाग दोन शेतशिवारातील गट नंबर २२७ मधील शेतकरी महिला संध्या कचरे यांच्या दोन एकर शेतीत मोठे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी पेरणी केलेला हरभरा उगवला होता, पण अचानक शनिवारी आलेल्या जोरदार पावसामुळे अर्ध्याहून अधिक पीक नष्ट झाले आहे. आता पुन्हा हरभऱ्याची पेरणी करावी लागणार असल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सध्याची स्थिती बघता पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते, पेरणी खर्च, मजुरी असा मोठा खर्च हरभरा पिकाला लागलेला असताना, पावसामुळे पुन्हा पेरणी करावी लागत आहे. ‘खर्च वाढला आणि उत्पन्न नाही’ अशा स्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.

जालन्यात शेतकरी मेटाकुटीला, परतीच्या पावसाची सरासरी 100 मि.मी. पेक्षा जास्त

कापूस आणि खारपाणपट्ट्यातील पिकांचेही नुकसान

या पावसामुळे केवळ हरभराच नव्हे, तर इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. कापसाचे पीक घरात येण्याची स्थिती असतानाच जोरदार पाऊस कोसळल्याने वेचणीचा कापूस भिजून मातीमोल झाला. पावसाचा जबर फटका हातरुण परिसरातील खारपाणपट्टयाला बसला आहे. मांजरी, शिंगोली, मालवाडा, दुधाळा, मंडाळा, बोरगाव वैराळे, अंदुरा भाग एक, अंदुरा भाग दोन, लोणाग्रा, हातला आणि हातरुण या शेतशिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर संकट काळात तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: The grown gram is wasted farmers in balapur taluka face the problem of double sowing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • Akola
  • farmer

संबंधित बातम्या

मलकापूर पांग्रा शिवारात एलसीबीची धडक कारवाई; १२.५२ लाखांचा गांजा जप्त
1

मलकापूर पांग्रा शिवारात एलसीबीची धडक कारवाई; १२.५२ लाखांचा गांजा जप्त

अवैध गौण खनिज प्रकरणात तहसीलदारांचा दंड बेकायदेशीर; वाहनधारकांना दिलासा
2

अवैध गौण खनिज प्रकरणात तहसीलदारांचा दंड बेकायदेशीर; वाहनधारकांना दिलासा

Murtizapur News: पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांचे विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन
3

Murtizapur News: पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांचे विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन

Akola ACB Trap: अकोला जिल्हा परिषदेत एसीबीचा दणका! आंतरजातीय विवाह अनुदानासाठी लाच घेणारा दलाल जाळ्यात
4

Akola ACB Trap: अकोला जिल्हा परिषदेत एसीबीचा दणका! आंतरजातीय विवाह अनुदानासाठी लाच घेणारा दलाल जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.