जालन्यात पावसाचे थैमान (फोटो सौजन्य - iStock)
जालनाः भोकरदन तालुक्यातील गतवर्षी पेक्षा १३३ मी मी पाऊस जास्त झाला असून सरासरीपेक्षा अधिक टक्के पाऊस जास्त पडला आहे. परतीच्या पावसाने हाती आलेले खरिपातील पीक हिरावून घेतले आहे. कापणी सुद्धा खोळंबली असली तरी उभी पीक आडवी झाली आहेत पंचनामे सुरू असले तरी प्रत्यक्षात किती मदत मिळेल याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यावर पावसाचे संकट कायम आहे. परतीचा पाऊस लांबल्याने गुरुवारी देखील जालन्यातील भोकरदन शहरदार आणि परिसरात दुपारपासूनच पाऊस सुरू होता. दररोज अशीच पावसाची ढगांच्या गडगडाट सह वर्णी लागत आहे गेले काही दिवसात भोकरदन मध्ये परतीच्या पावसाची सरासरी १३३.२ मिमी पेक्षा जास्त नोंदवली गेली आहे तर केवळ जून ते ३० सप्टेंबर ५२७.७ मिमी नोंदविली गेली आहे.
रोजच तालुक्यात पाऊस लावतोय हजेरी
भोकरदन परिसरामाये झालेल्या अवकाळी पावसाने भरलेली केि मातीत गेली आहे. यावणी चामाला पाऊस झाल्याने पीक ही जोमाने फुलून आले होते. मात्र परतीच्या पावसाने घास हिरावून घेतल्याचे चित्र पाहवयास मिळाले पूर्ण खरीप हंगामात विविध संकटाना सामोरे जात येथील शेतकऱ्यांनी खरिपाची शेती पिकवली होती. मोठ्या कष्टाने चिकवलेले धान्य घरात आणण्याच्या शेवटच्या क्षणालाही पावसाने धांदल उडवल्याने शेतकरी चिंतातूर झाला. पावसाचा कोणताच अंदाज नसताना गेल्या काही आठवडा पासून दुपारनंतर पावसाने रंग दाखवण्यास सुरुवात केली.
तालुक्यातील सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडत असल्याचे नोंदणी निहाय दिसून येत असले तरी गेल्या चार-पाच वर्षे पासून तालुक्यातील पावसाची सरासरी कमी अधिक जास्त नोंदविली गेली आहे. पावसाने कापलेलों मका, सोयाबीन सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्यास संधीच दिली नाही.
कौतुकास्पद! एस. टी. सुरक्षारक्षकाची प्रामाणिकता; साडेतीन लाखांच्या लालसेवर माणुसकीचा विजय
जून ते ३० सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस
| मंडळ | वार्षिक सरासरी | झालेला पाऊस |
| भोकरदन | 546.5 | 826.6 |
| सिपोरा बाजार | 546.5 | 699 |
| धावडा | 546.5 | 700.6 |
| अनवा | 546.5 | 688.1 |
| पिंपळगाव रे.. | 546.5 | 693 |
| हसनाबाद | 546.5 | 634.4 |
| राजुर | 546.5 | 826.5 |
| केदारखेडा | 546.5 | 747.3 |
| एकूण | 546.5 | 727.7 |
दरम्यान ऑक्टोबर महिन्यात 82.5 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. भोकरदनमध्ये जून ते ३० सप्टेंबरपर्यंत ५२७.७ मिमी पडला पाऊस आहे. अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी पीक घरात आणण्याच्या उद्देशाने मका आणि सोयाबीन सोंगनीला सुरुवात केली होती, या पावसाचा सर्वाधिक फटका सौगणी करून शेतात ठेवलेल्या मका पिकाला बसला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी मक्का पाण्यात वाहताना दिसून आली तर मक्याची कणसे पूर्णपणे भिजून गेली आहेत.
हवामान खराबामुळे शहरात साथरुग्णांच्या संख्येत वाढ
शहरासह तालुक्यात मागील दोन आठवड्यांपासून असलेले खराब हवामान, वादळी वारा, पाऊस, ढगाळ वातावरण व त्यात पावसाची सततधार अनेकांच्या मुळावर उठले आहे. शहरात साथ आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. प्रामुख्याने वृद्ध व बालकांना साथ आजारांनी घेरले असून, अनेक बागा सच्या तापाच्या रुग्णांनी दवाखाने हाउसफुल भरले आहेत. सध्या शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयातही बहुसंख्य रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लहान मुलांना प्रामुख्याने पेशी कमी होणे, कावीळ, सर्दी, खोकला, थंडी-ताप आदी आजारांनी हैराण केले आहे. खोकला मेडिकल दुकानातून कफ सिरप, सर्दीसाठी वापरल्या जाणाऱ्या बाम व पेनकिलरची विक्री वाढली आहे. अशातच मध्य प्रदेशातील कोलड्रिफच्या बळींनी व दर्जाहीन औषधांनी पालकांच्या पोटात गोळा उठला आहे.
नपा प्रशासन मात्र ढिम्म
या काळात सुरू असलेल्या खासगी रुग्णालयात मोठी गर्दी होत होती. जन्मजात बालकांनाही खराब हवामानाचा मोठा त्रास होत आहे. कावीळ, कफ, न्यूमोनिया अशा प्रकारचा त्रास होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले, या लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. वेळी घर व परिसरातील स्वछता, स्वच्छ व सांडपाण्याची डबकी याकडे त्याच लक्ष देतानाच जंतुनाशक औषध फवारणी आवश्यक असल्याचे नागरिक बोलत आहे शहरातील काही डॉक्टरांच्या मते पेशी कमी झालेले रुग्णही वाढले आहेत. यात सर्वच वयोगटातील रुगणांचा समावेश आहे. अशा परिस्थितीमुळे एखाद्या वेळेस डेंग्यूची साथ देखील येऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे.
महत्वाचे म्हणजे वृद्धांना ढगाळ वातावरणाचा मोठा डोके वर काढले अनेकांचा कार सततच्या संधिवात आहे. दम, आस्थमा, अॅलर्जी असलेले वृद्ध वस्त झाले अहेत. गुडघेदुखी व संधिवाताच्या वेदना असह्य होत आहेत, ढगाळ वातावरण, ऊन, वारा, पाऊस, सांडपाणी व अस्वच्छ पाण्याची डबकी, डासांचे साम्राज्य, आदि अनेक गोष्टी आजाराला कारणीभूत ठरत आहेनपा प्रशासनाचीही याबाबतची भूमिका डीम्म असल्यासारखी आहे. जनजागृतीसाठी कुठल्याही उपाययोजना नाही. घुर फवारणी बंद आहे. स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडाला आहे.






